Home »Business »Business Special» Gross Direct Tax Collection Up 8 Pc In April-December

प्रत्यक्ष कर संकलनात झाली वाढ

प्रतिनिधी | Jan 05, 2013, 22:45 PM IST

  • प्रत्यक्ष कर संकलनात झाली वाढ

मुंबई- चालू आर्थिक वर्षातल्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ढोबळ प्रत्यक्ष कर संकलनात केवळ 8.01 टक्क्यांची वाढ होऊन ते वार्षिक आधारावर 4.28 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. याच कालावधीत कंपनी कर संकलनात 4.94 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे वित्तमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन आढावा कालावधीत 3,96,530 कोटी रुपयांवरून 4,28,278 कोटी रुपयांवर गेले आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन मात्र लक्षणीय 13.70 टक्क्यांनी वाढून ते अगोदरच्या वर्षातल्या याच कालावधीतील 3,23,956 कोटी रुपयांवरून 3,68,322 कोटी रुपयांवर गेले.


अग्रिम कर संकलनात डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत लक्षणीय 10.44 टक्क्यांची वाढ होऊन ते अगोदरच्या वर्षातल्या 70,826 कोटी रुपयांवरून 78,226 कोटी रुपयांवर गेले आहे. परंतु एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मात्र अग्रिम कर संकलनात केवळ 7.52 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

संकलनाचे लक्ष्यासाठी आणखी तीन महिने
चालू आर्थिक वर्षातील 5.70 लाख कोटी रुपयांच्या कर संकलनाचे अर्थसंकल्पीय लक्ष्य गाठण्यासाठी प्राप्तिकर खात्याकडे आणखी 3 महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

Next Article

Recommended