आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीएसटी निवडणुकांनंतर : अहलुवालिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी) विधानसभा निवडणुकांनंतरच निर्णय होईल, असे मत नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केले.
अहलुवालिया म्हणाले की, वस्तू आणि सेवाकराचा प्रामुख्याने अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक चक्रावर परिणाम होत आहे. परंतु सार्वजनिक निवडणुकांशी निगडित असलेली सर्व राजकीय अनिश्चितता पुढील वर्षापर्यंत संपेल आणि ब-याच अडकून पडलेल्या कामांना चालना देण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. निवडणुका झाल्यानंतर पुढील वर्षात जीएसटीचा मार्ग सुकर होईल. या नवीन कराची अंमलबजावणी त्यानंतर काही महिन्यांनी झाली तरी अपेक्षांचा सकारात्मक परिणाम मोठा आहे.
असा विचार केला तर पुढील आर्थिक वर्षात सहा टक्के विकासदरापर्यंत जाता येऊ शकेल.