आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Gtalk Will Shut Down From 16 February Announced By Google

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Google ची घोषणा, 16 फेब्रुवारीपासून नेहमीसाठी बंद होईल \'Gtalk\' चॅटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Google ने आपली लोकप्रिय 'Gtalk' मॅसेंजर चॅटिंग सर्व्हिस नेहमीसाठी बंद करण्‍याची घोषणा केली आहे. 16 फेब्रुवारीपासून ही सेवा बंद होणार आहे. त्यानंतर युजर्सचा चॅटिंगसाठी Google Hangoutची मदत घ्यावी लागणार आहे. कोट्‍यवधी युजर्स 'Gtalk' सर्व्हिस अनेक वर्षांपासून वापरत होते.

Google ने Gtalk चे संशोधित व्हर्जन Hangout लॉन्च केले आहे. मात्र, Hangout अधिक जटील आणि गुंतागुंतीचे वाटल्यामुळे युजर्सनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळेच कदाचित Google ने आता 'Gtalk' नेहमीसाठी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. Gtalk ला Hangout हे पर्याय असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल नेटवर्कींग साइट 'फेसबुक'ने आपले मोबाइल अॅपमधून चॅटिंग सर्व्हिस वगळली होती. त्यासाठी मॅसेंजर अॅप डाउनलोड करणे बंधनकारक केले होते.

डाउनलोड करावे लागेल Hangout
Google ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची 'फ्युचर' Hangout आहे. त्यामुळे Gtalk बंद करावे लागले. Gtalk चे डेस्कटॉप अॅप्लिकेशनसाठी सर्व्हिस सपोर्ट आणि नवे व्हर्जन लॉन्च करणे कंपनीने बंद केले होते. तेव्हापासून Gtalk बंद करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.
मात्र, सध्या Gtalk बंद झालेले नाही. युजर्स chrome browser वर Gtalk वापरू शकतात. 16 फेब्रुवारीनंतर युजर्सला डेस्कटॉप क्लाईंटसाठी Gtalk Appच्या ठिकाणी Hangout चा वापर करावा लागेल.