आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Is India's Top State In Economic Freedom News In Divya Marathi

मोदींच्या नावानं गुजरातच्या कंपन्यांचं चांगभलं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कथित मोदी लाटेवर स्वार होत गेल्या सप्टेंबर महिन्यापासून मुंबई शेअर बाजार निर्देशांक (सेन्सेक्स) सुमारे 15 टक्के वधारला असून गुजरातमधील कंपन्यांच्या शेअर्सचे मूल्यामध्ये तब्बल तीनपट वाढ झाली आहे. गतवर्षी 13 सप्टेंबर रोजी भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींची निवड केल्यानंतर गुजरातमध्ये कारखाने असलेल्याच नव्हे तर गुजरातमधून संचालन कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींमध्येही घसघशीत वाढ झाल्याचे विश्लेषणात दिसून आले. सेन्सेक्स 14.67 टक्यांनी वधारला आहे. मोदी पंतप्रधान होणारच या ठाम समजुतीवर गुजरातमध्ये मूळ असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये रॅली दिसून येत आहे, परंतु ही अपेक्षा फोल ठरल्यास हेच शेअर्स धाडकन जमिनीवर येतील, असा सतर्कतेचा इशाराही या तज्ज्ञांनी दिला आहे. सर्वाधिक फायदा अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायजेसला झाला आहे.

सेन्सेक्स उसळणार
केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास शेअर बाजारात दहा टक्क्यांची वाढ होईल, असा अंदाज जपानी ब्रोक रेज कंपनी नोमुराने व्यक्त केला आहे. उदाहरणार्थ सद्य:स्थितीत 22 हजारांवर असलेला सेन्सेक्स सुमारे 2200 अंकांनी वधारण्याची शक्यता आहे.