आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी-सरस्वतीचा संगम साधा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - लक्ष्मी चंचल आहे. ती स्थिर राहावी, असे वाटत असेल, तर सरस्वतीची साथ आवश्यक आहे. ‘ज्ञानसंगम परिषदे’च्या निमित्ताने असा संगम साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केले. सरकार बँकांच्या कारभारात कोणताही हस्तक्षेप करणार नाही तसेच वैयक्तिक कामांसाठी पंतप्रधान कार्यालयातून कुठलाही फोन केला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाहीदेखील मोदी यांनी याप्रसंगी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा, आर्थिक सेवा सचिव हसमुख अधिया या वेळी उपस्थित होते.

एनआयबीएमच्या वतीने आयोजित दोनदिवसीय ज्ञानसंगम परिषदेचा समारोप तसेच सादरीकरण पंतप्रधान मोदी यांच्यासमोर झाले. त्यानंतर मोदी बोलत होते. ‘जपान, चीन यांनी आर्थिक विकास वेगाने साधला. त्यांच्या बँका जगातल्या पहिल्या दहा उत्तम बँकांमध्ये गणल्या जातात, असे सांगून मोदी म्हणाले, ‘देशातील बँकांकडून पंतप्रधानांना अशा प्रकारचे सादरीकरण आणि जबाबदारी देणे प्रथमच होत असावे. जन-धन योजनेसारखी योजना बँकांच्या सहकार्यामुळेच यशस्वी होत आहे. अवघ्या तीन दिवसांत सात कोटी कुटुंबांपर्यंत ही योजना पोहोचली असून देशातील एकतृतीयांश कुटुंबांना बँक खात्यात थेट अंशदान जमा करणे शक्य झाले आहे. जाहिराती देतानाही देशातील सर्व २७ सरकारी बँकांनी त्या एकत्रित कराव्यात. सरकार २०२० पर्यंत ११ कोटी घरे बांधणार असल्याने बँकांसाठी ही व्यवसायाची मोठी संधी आहे.

- बँकांनी विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने कर्ज द्यावे. - रोजगार निर्मितीची क्षमता अधिक असणार्‍या उद्योगांना प्राधान्यक्रम द्यावा.
- बँकांनी त्यांच्या व्यावसायिक यशाचे निकष नव्याने ठरवावेत.
- सामाजिक जबाबदारी म्हणून दरवर्षी एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे.

नफ्याकडे लक्ष द्या
सार्वजनिक बँकांचे नफ्याकडे लक्ष नसल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले, ते म्हणाले सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ८१ टक्के शाखा असून त्यांच्याकडे ७७ टक्के ठेवी आहे. मात्र, त्यांच्या निव्वळ नफ्याचे प्रमाण मात्र ४५ टक्के आहे. ते वाढवणे आवश्यक आहे.