Home | Business | Gadget | haier air conditioner

एसी खरेदीसाठी सबुरी दाखवा!

वृत्तसंस्था | Update - Jun 13, 2011, 03:18 AM IST

एसीची विक्री थंड असते तेव्हा ग्राहकांना घसघशीत सूट दिली जाते. कंपन्या येत्या 10 ते 15 दिवसांत अशा ऑफर जाहीर करण्याची शक्यता आहे.

  • haier  air conditioner

    एसीची विक्री थंड असते तेव्हा ग्राहकांना घसघशीत सूट दिली जाते. कंपन्या येत्या 10 ते 15 दिवसांत अशा ऑफर जाहीर करण्याची शक्यता आहे.
    ही परिस्थिती कशी निर्माण होते
    आता पावसाळा सुरू झाला आहे, कंपन्यांना विक्रीचे उद्दिष्ट गाठणे कठीण असते. त्यामुळे ग्राहकांना विशेष सूट किंवा एखादी ऑफर मिळू शकते. ऑफरमध्ये प्रवासी बॅग किंवा फुटवेअर उत्पादने मिळू शकतात. इस. 2008-09 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा एसी तयार करणार्‍या कंपन्यांनी 5 ते 10 टक्के इतकी सूट दिली होती. उकाडा कमी होत चालल्याने आता कुठे उन्हाच्या त्रासापासून थोडासा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसात जर आपण एसी खरेदी करणार असाल तर आपल्या खिशालाही परवडण्याजोगा निर्णय घेता येऊ शकतो. या क्षेत्रातील कंपन्या आणि त्यांचे डीलर्स 10- 15 दिवसात विक्री वाढवण्यासाठी डिस्काऊंट किंवा ऑफर्सच्या घोषणा करतील. कारण या वर्षी उन्हाळा कडक जाणवला नाही, तसेच विक्रीचे उद्दिष्टही बर्‍याच कंपन्यांचे पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कंपन्यांच्या मते, या वर्षीही विक्री ठरवलेल्या उद्दिष्टांपेक्षा 10 ते 15 टक्क्यांनी कमीच राहण्याची शक्यता आहे. हिताची कंपनीचे उपाध्यक्ष गुरुमितसिंग यांच्या मते, यंदा उन्हाळा कडक राहिलेला नव्हता. त्यामुळे एसीला मागणी कमी राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत जानेवारी ते जूनदरम्यान विक्रीचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता वाटते. महागाईमुळे लोकांनी एसी घेण्याचे टाळले, हेही विक्री कमी राहण्याचे एक प्रमुख कारण आहे. र्मक इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)चे उपाध्यक्ष र्शीराम कृष्णमूर्ती यांनी सांगितले, एसीची विक्री हवामान योग्य नसल्याने अपेक्षेपेक्षा कमी झाली. कंपन्यांकडे आता 5 ते 10 दिवसांचाच अवधी आहे. यानंतर सूट अथवा ऑफर कंपन्या जाहीर करू शकतात. यापूर्वी प्रथमच 2008-09 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही कंपन्यांनी अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्या होत्या.

    हायर अप्लायंसेज इंडिया प्रा. लि. चे विक्रीप्रमुख शांता राय संजीव यांनीही एसीची विक्री कमी झाल्याचे मान्य केले. जूनअखेरपर्यंत विक्रीचे उद्दिष्ट गाठले गेले नाही, तर एसी उद्योगासमोर ग्राहकांसाठी ऑफर्स देण्याचे पर्याय असू शकतात. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रा.लि. चे एसी विभागाचे प्रमुख अजय बजाज यांनी सांगितले, यावेळी विपरीत हवामानामुळे एसीच्या विक्रीत गती येऊ शकली नाही. परंतु आता विक्री वाढली आहे. आम्ही विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकतो असा विश्वास वाटतो. दिल्लीस्थित विविध नामांकित कंपन्यांची इलेक्ट्रॅानिक्स उत्पादने विकणार्‍या डी. के. ब्रांडचे प्रमुख जगदीश खट्टर यांनी सांगितले, या वेळी एसीच्या विक्रीत तेजी आलेली नाही, एसीची विक्री 25 ते 30 टक्के कमीच राहण्याची शक्यता आहे.Trending