मुंबई - उद्योग जगताचे नेतृत्व करणार्यांनी सीएसआर अर्थात सामाजिक जबाबदारीचे ध्येय साकारताना "समानतेबरोबर वृद्धी' या संकल्पनेचा अंगीकार करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती मोहंमद हमीद अन्सारी यांनी केले. मुंबई येथे इंडियन मर्चंट्स चेंबरच्या वतीने ‘मूल्य आणि संपत्ती निर्मिती’ या विषयावर आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते.
दीर्घकालीन निरंतर विकास समानतेशिवाय साध्य होऊ शकत नाही . सामाजिक सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून "सर्वांना बरोबर' घेऊन जाण्याचा पर्याय निवडण्याची गरज आहे.