Home | Business | Gadget | handle all web account on only one click

एका क्लिकवर सर्व वेब अकाउंट हाताळा!

दिव्‍य मराठी | Update - Apr 06, 2012, 11:01 PM IST

वनआयडी कोणत्याही युजरला त्याच्या अ‍ॅक्टिव्ह डिव्हाइस आणि कंट्रोल डिव्हाइसच्या मदतीने ओळखते.

 • handle all web account on only one click

  वनआयडीने एक असा लॉग इन तयार केला, ज्यात युजरला युजरनेम, पासवर्ड, कार्ड क्रमांक टाकण्याची गरज नाही. फ क्त एकदा क्लिक करून तुम्ही तुमचे सर्व वेब अकाउंट हाताळू शकता. याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, याला हॅक करणे खूप कठीण आहे. कारण वनआयडीमध्ये डेटा स्टोअरेजची कोणतीही केंद्रीय व्यवस्था नाही.
  30 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले सिलीकॉन व्हॅलीतील उद्योजक स्टीव्ह किर्श यांनी ही सफलता मिळवली आहे. त्यांना आशा वाटते की, हा वेबदुनियेत नवीन क्रांती आणू शकेल. ते स्वत: वनआयडीच्या माध्यमातून आपले 352 युजर नेम आणि पासवर्ड असणारे अकाउंट्स हाताळणार आहेत. युजरनेम आणि पासवर्ड मॉडेल बरेच गैरसोयीचे आहे. सर्व वेब अकाउंट्सने पासवर्ड आणि युजरनेम लक्षात ठेवणे कठीण काम आहे. तुम्ही सर्वांसाठी एकच युजरनेम आणि पासवर्ड ठेवल्यास सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठी जोखमीची बाब आहे. ही समस्या लक्षात घेऊन किर्श ने मल्टी डिव्हाइस व्हेरीफिकेशन सिस्टिम विकसित केले आहे, ज्यात पासवर्डची गरज नाही.
  वनआयडी कोणत्याही युजरच्या गुप्त सूचना पूर्णपणे गुप्त ठेवते. याला हॅक करणे कठीण असते. कारण याला पासवर्ड नसतो. कोणताही हॅकर ई-मेल आयडी किंवा इंटरनेट अकाउंट हॅक करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करतो. पण येथे तसे काहीच नाही.
  जर कोणी युजर वनआयडीद्वारे कोणाला पैसे पाठवणार असेल तर ते सुरक्षित आहे. कारण वनआयडीचा के्रडिट कार्ड क्रमांक कोणालाही कळणार नाही अशा भाषेत असतो. त्यामुळे त्याला हॅक करणे शक्यच नाही.
  वनआयडीचे कार्य असे चालते
  वनआयडी कोणत्याही युजरला त्याच्या अ‍ॅक्टिव्ह डिव्हाइस आणि कंट्रोल डिव्हाइसच्या मदतीने ओळखते. अ‍ॅक्टिव्ह डिव्हाइसचा वापर युजरला त्याचे खाते उघडण्यासाठी करता येतो. उदा. टॅब्लेट अथवा कॉम्प्युटर. तुमचा आयडी टाकल्यानंतर कॉम्प्युटर युजरच्या सेलफोनवर एक पिन पाठवतो. तो प्रत्येक लॉग इन करण्याबरोबर वेगवेगळा असतो. हा पिन पासवर्ड नसतो. डेटाबेसमध्ये जमाही होत नाही. बहुतांश हॅकर्स खाते उघडण्यासाठी वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करतात; पण वनआयडीमध्ये प्रत्येक वेळी पिन नंबर वेगळा असल्याने याला हॅक करणे अशक्य आहे.

Trending