आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हर्लेची लेटेस्ट ब्रेकआऊट बाइक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हर्ले डेव्हिडसनच्या सॉफ्टेल फॅमिलीमध्ये तीन नव्या बाइक्स लाँच करण्यात आल्या आहेत. पैकी ब्रेकआऊट सर्वाधिक आकर्षक आहे. टू व्हीलर टेक्नॉलॉजीच्या पॉवर रेसमध्ये ही बाइक सर्वोत्कृष्ट नाही. मात्र, भारतीय बाइक उद्योगात हिने आपले स्थान निर्माण केले आहे.

ब्रेकआऊटला हर्ले डेव्हिडसन कंपनीची सर्वात लो-बाइक म्हणणे वावगे ठरणार नाही. सीटची उंची केवळ ६६० एमएम आहे. याचे डिझाइन ५० -६० च्या दशकातल्या लोकप्रिय गॅसर ड्रॅग मोटारसायकलसारखे करण्यात आले आहे.

बाइकचे वजन ३२२ किलो आहे. त्यामुळे पार्किंग करताना थोडी मेहनत घ्यावी लागते. हँडलबारवर क्रोम-कोटेड सिंगल डायल स्पीडोमीटर आहे. छोट्या आकाराचे मल्टी फंक्शनल एलसीडी डिस्प्ले आहे. याद्वारे इंजिन स्पीडची माहिती कळते.
सॉफ्टेल फॅमिलीची सदस्य असल्यामुळे ब्रेकआऊटमध्ये १६९० सीसी, फोर-स्ट्रोक, व्ही-ट्विन, एअर-कूल्ड इंजिन आहे.
हर्लेची बाइक हायवेसाठी परफेक्ट आहे. याचे १२० एमएम ग्राउंड क्लिअरन्स खूप लो आहे. बाइकची लांबी -२४४५ एमएम, रुंदी-९१५ एमएम आणि उंची -१०४० एमएम आहे. यात हँडल-माउंटेड इंडिकेटर आणि बफ्ड लिव्हर आहे. यातील ड्युएल टोन व्हीलचा लूक आकर्षक आहे.

एबीएस ब्रेक्स
बाइकच्या २९२ एमएम रिअर डिस्क ब्रेकमध्ये एबीएस आहे. यात ६-स्पीड गिअरबॉक्समध्ये मेकॅनिकल शिफ्ट आहे.