आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Harvard Business Review Latest News In Divya Marathi

कार्यालयातील सहकायाकडूनही बरेच काही शिकता येते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यायाम आणि कसरती केल्याने तणाव कमी होतो. तसेच फिस आणि घरातील कामांमध्ये संतुलन राहते. एक उत्तम व्यवस्थापक बनण्यासाठी कर्मचायांना त्यांच्या क्षमतेनुसार कामासाठी वेळ आणि कामाची पद्धत यामध्ये लवचिकता आणणे आवश्यक असते. याविषयी ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’मधील काही टिप्स..
व्यायाम केल्याने तणाव कमी होतो
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, नियमित व्यायाम केल्याने कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात संतुलन राहते. व्यायाम केल्यामुळे ताण कमी होतो. त्यामुळे इतर कामे अधिक प्रभावी आणि आनंददायी होतात. नियमित व्यायाम करणारे लोक घर किंवा ऑफिसमध्येही एखादे काम उत्कृष्ट रीतीने करण्यासाठी नेहमी सज्ज असतात. अधिक चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी दिवसाच्या सुरुवातीलाच व्यायाम करावा. व्यायाम करण्यासाठी दिवसभरातील कामातून एखादा ब्रेकही घेता येईल. फिसमध्येच वर्कआउटची सुविधा असल्यास उत्तम. कारण व्यायाम केल्यानंतर फिसमधील पुढचे काम अधिक चांगल्या प्रकारे होण्याची दाट शक्यता असते. (स्रोत : हाऊ रेग्युलर एक्सरसाइज हेल्प यू बॅलन्स वर्क अँड फॅमिली- रसेल क्लेटन)
धोरणात्मक आराखड्यात कठीण शब्द नकोत
एखाद्या धोरणात्मक आराखड्याची भाषा अतिशय साधी आणि समजण्याजोगी असावी. यात गुंतागुंतीचे आणि जड शब्द नसावेत. कठीण शब्दांचा वापर झाल्यास ही योजना कोणत्या पद्धतीने यशस्वी होईल, हेसुद्धा सदस्यांना कळत नाही. एका मोठ्या वित्तीय सेवा पुरवणाया कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकायांनी ‘लिव्हरेज’, ‘सिनर्जी’, ‘डिसइंटरमिडिएशन’ आणि ‘रोबस्ट’सारखे शब्द वापरण्यास मनाई केली आहे. उत्तम धोरणात्मक आराखडा आखून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करू शकते, तेच योग्य नेतृत्व असते. (स्रोत : फोर टिप्स बेटर स्टॅटजिक प्लानिंग-रॉन अ‍ॅश्केनास व लोगान शेंडलर)
फॅमिली-फ्रेंडली मॅनेजर बना
अनेक व्यवस्थापकांना कर्मचायांच्या कौटुंबिक सोयीनुसार काम देण्याची इच्छा असते; पण एखाद्या कर्मचायाने अशा प्रकारची विनंती केल्यास व्यवस्थापकांना उत्तर देणे कठीण जाते. अशा वेळी कर्मचायांना थोडी लवचिकता देताना पुढील पद्धती वापरता येतील. पहिली- कर्मचायांच्या कामाचा आढावा नेहमी घेत राहा. त्यांचे प्रगतिपुस्तक नियमितपणे देत राहा. दुसरी- काम सोपवा, मार्गदर्शन करा आणि कर्मचायांना विश्वास संपादन करण्याची संधी द्या. कर्मचायांना मार्गदर्शन, फीडबॅक आणि स्रोत उपलब्ध करून स्वबळावर काम करण्यासाठी समर्थ बनवा.
(स्रोत : हाऊ टू बी अ फॅमिली-फ्रेंडली बॉस-स्कॉट बेहसन)
कनिष्ठांकडूनही शिकत राहा
अनेकदा कनिष्ठ कर्मचायांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्याला स्वत:ची विचारसरणी कळते. एक एक्झिक्युटिव्ह पदाचा अर्थ समजावून सांगत असताना आपली सध्याची कामाची पद्धत योग्य आहे किंवा नाही, तसेच ती पद्धत कशी असावी, या गोष्टी पुन्हा शिकायला मिळतात. आपल्यापेक्षा कनिष्ठांना नवी माहिती आणि दृष्टिकोनाविषयी सांगत असताना आपल्या कामातही सुधारणा होते. (स्रोत : एचबीआर गाइड टू गेटिंग द मेंटरिंग यू नीड)
उलट प्रश्नांमुळेही फायदे होतात
कामासंबंधी गोष्टींवर खुली आणि निकोप चर्चा व्हावी; पण या चर्चेदरम्यान वादविवाद झाले नाहीत तर त्यातून निर्मिती होण्याची शक्यता फार कमी असते. अर्थात चर्चेतील उलट प्रश्न त्रासदायक असू शकतात. मात्र, या प्रक्रियेमुळे जोखीम ओळखता येते तसेच ती कमी करण्याची प्रक्रियाही करता येते. हाच खरा निर्मितीचा स्रोत आहे. चर्चेत वादविवाद होत असतानाही आपण एक चांगली प्रतिमा जपू शकतो. कुणी आपल्याशी सहमत नसल्यास पुढील पद्धती वापरता येतात. पहिली- आपले विरोधी विचार ‘किंतु’, ‘परंतु’ अशा शब्दांऐवजी ‘तसेच’ या शब्दाचा वापर करून व्यक्त करा. उदा. ग्राहक नाराज होतील, असे म्हणण्याऐवजी ‘ग्राहक हे कोणत्या स्वरूपात घेतील?’ असे म्हणू शकता. (स्रोत : कॉन्फ्लिक्ट स्ट्रॅटेजीज फॉर नाइस पीपल-लिएन डेव्ही)