Home | Business | Auto | haryana government enters in maruti strike

‘मारुती’तील संपात हरियाणा शासनाची एन्ट्री

वृत्तसंस्था | Update - Jun 11, 2011, 04:48 AM IST

सात दिवसांपासून येथील कामगार वेगळ्या कामगार संघटनेच्या मागणीवरून संपावर आहेत

  • haryana government enters in maruti strike

    चंदिगड-मानेसर- मारुती सुझुकीच्या मानेसर प्रकल्पातील संपाचे लोण गुडगाव-मानेसर औद्योगिक पट्ट्यातही पसरण्याच्या भीतीमुळे हरियाणा शासनाने आज संप बंदीचा आदेश लागू करून हे प्रकरण कामगार न्यायालयाकडे सोपवले.

    मानेसर प्रकल्पात संप पुढे सुरू राहण्यावर प्रतिबंध घालण्यात आला असल्याची माहिती हरियाणाचे श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शिवचरणलाल शर्मा यांनी दिली. मारुती सुझुकीतील संपाला पाठिंबा असणा-या परिसरातील विविध कामगार संघटनांनी सोमवारपासून धरणे, मोर्चे काढण्यासह त्यांच्याही कंपन्यांत संप सुरू केला जाईल, असे म्हटले आहे.

    संपकरी आणि कंपनीचे व्यवस्थापन आपापल्या मुद्द्यांवर अडून बसल्याने संपावर बंदी घालून प्रकरण कामगार न्यायालयाकडे सोपविण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नसल्याची माहिती हरियाणा कामगार विभागाच्या अधिका-याने दिली. सात दिवसांपासून येथील कामगार वेगळ्या कामगार संघटनेच्या मागणीवरून संपावर आहेत. मारूतीच्या या कारखन्यात दररोज १२०० कारचे उत्पादन होते.

Trending