आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हावेल्‍सने खास ग्रामीण भागासाठी लॉंच केला \'रिओ\' स्विच, महाराष्‍ट्राकडे कंपनीचे विशेष लक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जागतिक दर्जाची आणि १३० अब्ज डॉलर उलाढाल असलेली हावेल्स इंडियाने आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. येत्या दोन वर्षात ३० नवी गॅलक्सी केंद्रे सुरु करणार असल्याचे कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी जाहीर केले. यापैकी १५ पुणे विभागात म्हणजे नाशिक, औरंगाबाद कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड आणि गोव्यात असणार आहेत.

हावेल्स इंडियाने आज (10 जुलै) रिओ हा नवा स्विच देशाच्या ग्रामीण भागासाठी बाजारात आणला. महाराष्ट्रातील विस्ताराविषयी अग्रवाल म्हणाले, की सध्या ५० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या १२० शहरात कंपनीची विक्री केंद्रे आहेत. ही संख्या १७० केली जाणार आहे. या सर्व शहरात रिओला चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे. सध्या २८० वितरक असून त्यात आणखी १०० केंद्राची भर घातली जाणार आहे. गॅलक्‍सी केंद्रे सध्या देशात २०० आहेत. त्यातून कंपनीला ४५० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. उत्पादन क्षमता वाढीसाठी हिमाचल प्रदेशातील बद्दी येथील प्रकल्पात आणखी १०० कोटी रुपये गुंतवले जात आहेत. येत्या दोन महिन्यात उत्पादन क्षमता पाच लाख युनिटवरून दहा लाख युनिट होणार आहे. एकट्या पुणे विभागाची बाजारपेठ १५ टक्के सरासरी वाढते आहे. या विभागाची उलाढाल ८४ कोटी रुपयांवरून १२५ कोटी रुपये होईल.

देशात मंदीची स्थिती असतानाही घरांच्या वाढत्या संख्येने वीज उपकरणांना मागणी वाढत आहे. जगात ५० देशात कंपनीचे ६५०० कर्मचारी आहेत. जगातील युरोप, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका वगळता सर्वाधिक म्हणजे १४ उत्पादन प्रकल्प एकट्या भारतात आहेत. एकूण उलाढालीत जगातील ७००० कोटी रुपये उलाढालीपैकी ४२०० कोटी रुपये एकट्या भारतातून येतात. यावरून देशाचे महत्व लक्षात येते.

कंपनीने दिल्लीत ग्राहकाच्या शंका निरसनासाठी कॉल सेंटर सुरु केले असून सध्या इंग्रजी, हिंदीसह पाच भाषात सेवा दिली जाते. तक्रारीचे कमाल ४८ तासात निवारण केले जाते. येत्या काही महिन्यात गुजराती, मराठीत सेवा सुरु होणार आहे.