Home | Business | Gadget | hcl 3 g tablet launching in the month of august

एचसीएलचा थ्री जी टॅब्लेट पीसी ऑगस्टमध्ये

वृत्तसंस्‍था | Update - Jun 20, 2012, 11:34 PM IST

कंपनीने आपल्या या उत्पादनाचे सांकेतिक नाव वाय - 2 असे ठेवले आहे.

  • hcl 3 g tablet launching in the month of august

    नवी दिल्ली- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी एचसीएल इन्फोसिस्टिम्स येत्या ऑगस्ट महिन्यात थ्री जी टॅब्लेट पीसी बाजारात दाखल करणार आहे. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष व मोबिलिटी विभागाचे प्रमुख गौतम अडवाणी यांनी ही नवी दिल्लीत ही माहिती दिली. ऑगस्ट महिन्यात बाजारात दाखल होणा-या या टॅब्लेट पीसीची किंमत सुमारे 18,000 रुपये असेल. कंपनीने आपल्या या उत्पादनाचे सांकेतिक नाव वाय - 2 असे ठेवले आहे. अशाप्रकारच्या टॅब्लेट मार्केटमध्ये कंपनीची भागीदारी सुमारे 15%, तर 10,000 रुपये किमतीच्या टॅब्लेट पीसी मार्केटमध्ये कंपनीचा वाटा सुमारे 50% असल्याचे गौतम अडवाणी यांनी सांगितले.

Trending