Home | Business | Gadget | hcl launches new tablet for study

अभ्यासाची नवी मजा : एचसीएलचा नवा टॅब्लेट

वृत्तसंस्था | Update - Apr 05, 2012, 01:19 AM IST

आयटी उत्पादनांची निर्मिती करणारी देशातील अग्रगण्य कंपनी एचसीएलनेही टॅब्लेट कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.

 • hcl launches new tablet for study

  नवी दिल्ली- आयटी उत्पादनांची निर्मिती करणारी देशातील अग्रगण्य कंपनी एचसीएलनेही टॅब्लेट कॉम्प्युटरच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. कंपनीने नुकतेच एचसीएल एमई यू1 आणि एचसीएल मायएड्यू हे दोन टॅब्लेट बाजारात उतरवले आहेत. कंपनीचे सीनियर व्हाइस पे्रसिडेंट आनंद एकांबरम यांनी सांगितले की, या टॅब्लेटचा वापर शाळेतील ग्रंथालयांतदेखील करता येईल. यातील अभ्यासक्रम वर्गांनुसार अपग्रेडही करता येईल.
  माय एड्यू टॅब
  यासोबतच एचसीएलने शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांना केंद्रस्थानी ठेवून माय एड्यू टॅबदेखील लाँच केला आहे. याची दोन मॉडेल्स माय एड्यू टॅब के-12 आणि माय एड्यू टॅब हायर एज्युकेशन (एचई) सादर करण्यात आली आहेत. के-12ची किंमत 1,499 तर एचई टॅब 9,999 रुपयांना मिळेल. दोन्ही टॅब्लेटची वैशिष्ट्ये यू-1सारखीच आहेत.
  एचसीएल एमई यू-1
  किंमत 7999 रुपये
  कॅमेरा 0.3 एमपी फ्रंट कॅमेरा
  प्रोसेसर 1 गीगाहर्ट्झ
  मेमरी 512 एमबी रॅम डीडीआर 3
  ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड ओएस 4.03 (आइस्क्रीम सँडविच)
  डिस्प्ले 800/480 पिक्सलसह 7 इंचांची कॅप्टिव्ह टच स्क्रीन
  स्टोरेज क्षमता 4 जीबी, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवण्याची क्षमता
  कनेक्टिव्हिटी यूएसबी मोडेमच्या माध्यमातून थ्रीजी, वायफाय
  इतर फूल यूएसबी, मिनी यूएसबी पोर्ट, मायक्रो एसडी कार्ड स्लॉट
  ही कमतरता
  एचसीएलच्या टॅब्लेटमध्ये अँड्रॉइड स्टोर वा गुगल प्लेस्टोर ही फीचर्स नाहीत. यामुळे ग्राहकांना आइस्क्रीम-सँडविचचा फायदा मिळू शकणार नाही.
  मायक्रोमॅक्सचा फनबुक टॅब्लेट
  मोबाइल जगतातील दिग्गज कंपनी मायक्रोमॅक्सनेही आपला टॅब्लेट सादर केला आहे. मायक्रोमॅक्स इर्न्फोमॅटिक्स लिमिटेडने 10 ते 21 वर्षे वयोगटासाठी 6,499 रुपयांचा फनबुक टॅब्लेट सादर केला आहे. किशोरवयीन मुलांना शिक्षणासाठी या टॅब्लेटचा चांगलाच उपयोग होणार आहे. कोणत्याही इयत्तेच्या अभ्यासक्रमासाठी 799 रुपये भरल्यानंतर एका एसडी कार्डद्वारे हे टॅब्लेट घेता येणार आहे.

Trending