आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • HDFC Bank News In Marathi, Forex Plus Card, Divya Marathi

हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी आता एचडीएफसीचे फॉरेक्स प्लस कार्ड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हज आणि उमराह यात्रा करणा-या यात्रेकरूंसाठी एचडीएफसी बॅँकेने खास फॉरेक्स प्लस कार्ड आणले आहे. या कार्डाच्या मदतीने यात्रेदरम्यान येणारा कोणताही खर्च कोणत्याही अडचणीविना आणि सुरक्षितपणे करता येईल. विशेष करून सौदी रियाल चलन जवळ बाळगण्याची गरज नाही कारण या कार्डाचा एटीएम कार्ड म्हणूनही उपयोग करता येऊ शकतो.

या कार्डासाठी एचडीएफसी बॅँकेने ‘व्हिसा’बरोबर भागीदारी करार केला आहे. त्यामुळे या कार्डाच्याद्वारे निवडक खरेदी दालनांमधून केलेल्या खरेदीचे पैसे अदा करणा-या ग्राहकांना विशेष सुविधा व फायदे मिळणार आहेत. परकीय चलनाचे हे प्रीपेड कार्ड 18 ऑगस्टपासून एचडीएफसीच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध झाले आहे. बॅँकेचे ग्राहक नसलेल्यांनादेखील हे कार्ड मिळू शकते. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सुरू होत असलेल्या हज वार्षिक यात्रेमध्ये 1.7 लाख यात्रेकरूंपर्यंत पोहोचण्याचा बॅँकेचा विचार आहे. ग्राहककेंद्री दृष्टिकोनाशी सुसंगत राहून हे कार्ड खास करून हज आणि उमराह यात्रांसाठीच तयार केले असून वित्तविषयक अडचणींवरील तो एक योग्य उपाय असल्याचे बॅँकेचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष पराग राव यांनी सांगितले.

यात्रेकरूंना काय करावे लागेल
० एचडीएफसी बॅँकेच्या कोणत्याही शाखेत प्रवासाची आवश्यक ती कागदपत्रे बरोबर नेऊन एक अर्ज प्रपत्र भरून द्यावा लागेल.
० ग्राहकाला काऊंटरवरच फॉरेक्स कार्ड उपलब्ध करून दिले जाईल.
० सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर चार तासांमध्ये कार्यान्वित केले जाईल.
० कार्डासह एक बॅकअप कार्डही मिळते त्यामुळे मूळ कार्ड हरवल्यास किंवा त्याचे काही नुकसान झाल्यास हे कार्ड कार्यान्वित करता येते.
० कार्डामध्ये भरलेली रक्कम समाप्त झाली तर संबंधित हाजीच्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत बँकेच्या कोणत्याही शाखेमधून त्यामध्ये पुन्हा रक्कम भरता येते.