आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचडीएफसीच्या ई-सेवेला दोन दिवस राहणार ब्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नवीन सॉफ्टवेअर आणि डाटा अपग्रेड करण्यासाठी एचडीएफसी बँक शनिवार आणि रविवारी दोन दिवस ई-बँकिंग सेवा बंद ठेवणार आहे. एटीएम, डेबिटकार्ड, मोबाइल, नेटबँकिंग सेवा यामुळे प्रभावित होणार आहे. याबाबत बँकेने ग्राहकांना एसएमएस पाठवून सूचित केले आहे.


8 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 9 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एटीएम बंद राहणार आहेत. 8 रोजी दुपारी 2.30 वाजेपासून 9 रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत डेबिटकार्ड वापर करता येणार नाही.