आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ई-इच्छापत्र ३० मिनिटांत, एचडीएफसी सिक्युरिटीजतर्फे देशातील पहिली ई-विल सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एचडीएफसी सिक्युरिटीजने आज इच्छापत्र लिहिण्याची इलेक्ट्रॉनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच सुविधा आहे. यामुळे सर्वसामान्यांना सुरक्षितरीत्या ऑनलाइन ई-विल अगदी सहज आणि सहज तयार करता येणार आहे.
इलेक्ट्रॉनिक इच्छापत्र किंवा ई-विल तीन सोप्या टप्प्यांमध्ये सोयीस्करपणे आणि लगेच तयार करता येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि कुठूनही केवळ काही माऊस क्लिकवर ती पूर्ण करता येते, हे या सुविधेचे खास वैशिष्ट्य सांगता येईल.

ही सुविधा पूर्णपणे गुप्त आहे. इच्छापत्र अगदी आरामदायी आणि गुप्तपणे ग्राहकाच्या घरी किंवा कार्यालयात तयार करता येईल. ही विश्वासार्ह आणि परवडणारी सुविधा इच्छापत्र तयार करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करेल, असे एचडीएफसी सिक्युरिटीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ असीम ध्रू यांनी सांगितले.एचडीएफसी सिक्युरिटीज ही सुविधा कायदेशीर भागीदार विलजिनी सोबतच्या सहकार्यातून उपलब्ध करून देत असून ते सर्वसामान्यांना त्यांचे इलेक्ट्रॉनिक इच्छापत्र कुठलाही फोन कॉल,
ईमेल्स किंवा बैठकीशिवाय ३० मिनिटांत लिहिण्यासाठी मदत करेल.

कसे तयार होते ‘ई-इच्छापत्र’
तुमचे तुम्ही इलेक्ट्रॉनिक इच्छापत्र तयार करण्याची ही सुविधा १०० टक्के स्वयंचलित, सुलभ असून कुठल्याही सल्लागाराने ती तयार केलेली नाही किंवा त्यात हस्तक्षेप केलेला नाही. इच्छापत्र तयार करणा-याच्या मंजुरीसाठी ते पाठवले जाते. एकदा याला मंजुरी मिळाली की दीर्घकाळ टिकणारे हे इच्छापत्र तयार होते. सर्वसामान्य व्यक्ती इलेक्ट्रॉनिक इच्छापत्र सोप्या आणि त्रासाशिवाय असणा-या मार्गाने एचडीएफसी सिक्युरीटीजच्या www.hdfcsec.com या वेबसाइटवर तयार करू शकतात. सर्वांना त्यांच्या संपत्तीची यादी करावयाची असून कुणाला त्याचे वारस नेमायचे आहे हे लिहावे लागणार आहे. ही सुविधा चार हजार रुपये अधिक कर इतक्या परवडणा-या किमतीत उपलब्ध असून तुमची माहिती गुप्त राखली जाईल, याची हमी दिली जाणार आहे.