आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विमा एजंटांचे कमिशन घटवणार? तोटा घटवण्यासाठी प्रस्ताव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आरोग्य विमा व्यवसायातील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या तोट्याला कमी करण्यासाठी सरकारी विमा कंपन्या एजंटांचे कमीशन घटवून पाच टक्के करण्याचा विचार करत आहेत. सरकारी विमा कंपन्यांनी सम इन्शुअर्ड वैयक्तिक विमा पॉलिसीवर एजंटांचे कमीशन 10 टक्क्यांपेक्षा कमी आणि समूह आरोग्य विम्यावरील कमीशन 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची योजना आखली आहे.
ओरिएंटल इन्शुरन्सच्या एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले की, चारही सरकारी जनरल इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशनने (जिप्सा) ब्रोकरेज कमी करण्याचे धोरण आखले आहे. लवकरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे कंपन्यांच्या सूचनेनुसार सम इन्शुअर्ड वैयक्तिक पॉलिसीवर एजंटांचे कमीशन 10 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्यात येईल.
प्रस्ताव असे...
- ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरही एजंटांचे कमीशन 7.5 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव
- एकेरी पॉलिसीवर एजंटांचे कमीशन 14-15 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्के करण्यात येईल.
- एकेरी आरोग्य विमा पॉलिसीवर एजंटांचे कमिशन 13 ते 14 टक्क्यांवरून 5 टक्के होईल.
- ग्रुप हेल्श इन्शुरन्समधील पेमेंट घटवत 20 टक्के करण्याचा वित्त मंत्रालयाचा प्रस्ताव