आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Helping Hand Needed To Health Sector, Neeta Ambani's Appeal

आरोग्य क्षेत्रास मदतीचा हात देण्याची गरज, नीता अंबानी यांचे उद्योग, सामाजिक संस्थांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी औद्योगिक क्षेत्राने सरकारला अधिकाधिक सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी व्यक्त केले. या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर काम होणे गरजेचे असल्याचेही नीता यांनी स्पष्ट केले.
नवजात अर्भके, लहान बालके किंवा प्रसूतीदरम्यान होणा-या मृत्यूचे प्रमाण योग्य वेळी उपचार झाल्यास घटवता येऊ शकते, याकडे अंबानी यांनी लक्ष वेधले. त्यासाठी सरकारबरोबरच औद्योगिक क्षेत्र आणि सामाजिक संस्थांनीही प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नीता अंबानी या वेळी म्हणाल्या. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असूनही भारतात डॉक्टरांची कमतरता, सुविधांचा अभाव जागतिक दर्जाचे उपचार पुरवण्यात मात्र पूर्णपणे यश मिळाले नसल्याची खंतही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
देशात हजारहून अधिक लोकांमागे रुग्णालयात एक खाट, तर 1700 लोकांमागे एक डॉक्टर आहे. अशा विपरीत परिस्थितीत चांगली आरोग्य सेवा देणे अत्यंत कठीण असल्याचेही त्या म्हणाल्या. ही परिस्थिती मान्य करण्यासारखी नसून त्यादृष्टीने बदल घडवण्यासाठी आपले प्रयत्न गरजेचे असल्याचे नीता या वेळी म्हणाल्या.