आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर- ‘कोंबडी आधी की अंडं’ हा न सुटणारा प्रश्न. त्याचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत न पडता आपण अंडी खावी हेच बरे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’, असे आता म्हणता येईल. कारण वर्षाला 300 अंडी देणारी पुण्याची कोंबडी आली आहे. व्यंकटेश हॅचरीजने आणलेल्या या कोंबड्यांपासून मिळणारे उत्पन्न पाहिले की, कोंबडी सोन्याची नाही तरी सोन्यासारखी अंडी देते याची खात्री पटते. ‘लेयर बीव्ही-300’ या जातीची ही कोंबडी आकर्षणाचे केंद्र आहे. गावरान कोंबडी वर्षाला 70 ते 80 अंडी देते. पण, आमची कोंबडी वर्षाला 300 ते 315 अंडी देते, अशी माहिती डॉ. अमित येसकल व डॉ. दीपक कोळी यांनी दिली. 19 ते 72 आठवडे या कालावधीत कोंबडी अंडी देण्यास सुरुवात करते. अंडी देणे बंद केल्यावर कोंबडी 60 रुपयांना विकली जाते. कोंबडीला एका दिवशी 110 ग्रॅम खाद्य लागते. कोंबडीचे वजन 1100 ग्रॅम असल्याने मांसही चांगले मिळते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 'खाकी केम्बेल बदक'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.