आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजेनुसार चालू-बंद होणारी हीरोची आयस्मार्ट बाइक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतात सर्वाधिक मोटारसायकल निर्मिती करणार्‍या हीरो मोटोकॉर्प कंपनीने गुरुवारी स्प्लेंडर आयस्मार्ट ही नवी मोटारसायकल सादर केली.

० आयस्मार्टमध्ये 100 सीसी एअर कूल्ड फोर स्ट्रोक सिंगल सिलिंडर इंजिन आहे.
० या मोटारसायकलमध्ये आय 3 एस हे तंत्र वापरण्यात आले आहे. परिस्थितीनुसार इंजिन आपोआप बंद-चालू होण्याची सुविधा या तंत्रात आहे. जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा गाडी बंद होते आणि नंतर क्लच दाबताच सुरू होते.
० या तंत्रामुळे वर्दळीच्या रस्त्यावरही मोटारसायकल चांगले मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
० आयस्मार्ट मोटारसायकलला अलॉय व्हील्स आहेत. यात एक नवे क्लस्टर लावण्यात आले असून साइड स्टँडबाबत सूचना देण्याचे काम हे क्लस्टर करते.
० हीरो मोटोकॉर्पचे उपाध्यक्ष (विक्री) अनिल दुआ यांनी सांगितले, कंपनीने आय 3 एस या तंत्राच्या पेटंटसाठी अर्ज केला आहे.
० इतर मोटारसायकलींमध्ये या तंत्राचा वापर करण्याची कंपनीची योजना आहे. काही दिवसांनंतर प्लेझरची नवी आवृत्ती, एक्स्ट्रीम, करिझ्मा आणि झेडएमआर या नव्या दुचाकी आणण्याची
कंपनीची योजना आहे.