आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hero MotoCorp Announces Five year Warranty On All Two Wheelers

हीरोच्या दुचाकीवर पाच वर्षांची वॉरंटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी मोटारसायकल निर्माती कंपनी हीरो मोटोकॉर्प आता आपल्या सर्व मोटारसायकलींवर पाच वर्षांची वॉरंटी देणार आहे. कंपनीने सांगितले की, हीरोच्या सर्व मोटारसायकलींवर पाच वर्षे किंवा 70,000 किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) वॉरंटी देणार आहे. तर स्कूटर मॉडेल्सवर पाच वर्षे किंवा 50,000 किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) वॉरंटी देण्यात येणार आहे.


या योजनेबाबत हीरो मोटोकॉर्पचे वरिष्ठ उपाध्यक्ष (मार्केटिंग व सेल्स) अनिल दुआ यांनी सांगितले, आमचे ग्राहकांसोबत असणारे जुने संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कंपनीने सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांवर पाच वर्षे वॉरंटी देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीची सुविधा देणारी हीरो मोटोकॉर्प ही देशातील पहिली कंपनी आहे. कंपनीच्या मते, असे केल्याने ग्राहकांशी असलेले कंपनीचे नाते अधिक दृढ होईल आणि हीरो ब्रँडप्रति ग्राहकांचा विश्वास आणखी दुणावेल. हीरो मोटोकॉर्पची दुचाकी खरेदी करताना मिळणा-या पाच वर्षांच्या वॉरंटीमुळे बाजारातील कंपनीची पत व प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल, असे कंपनीच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. सध्या हीरो मोटोकॉर्पचे देशभरात पाच हजारांहून जास्त कस्टमर टच पाइंट आहेत. यात अधिकृत वितरक, अत्याधुनिक स्वयंचलित वर्कशॉप्स, स्पेअर पार्ट्स आउटलेट आणि विक्रेते यांचा समावेश आहे.

पुढचे पाऊल
> स्कूटर मॉडेल्सवर पाच वर्षे किंवा 50,000 किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) वॉरंटी.
> सर्व मोटारसायकलींवर पाच वर्षे किंवा 70,000 किलोमीटरपर्यंत (जे आधी होईल ते) वॉरंटी देणार.
> पाच वर्षांची वॉरंटी देणारी हीरो मोटोकॉर्प ही देशातील पहिली कंपनी आहे.