आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hero MotoCorp Begins African Safari; Starts Operations In Kenya

हीरो मोटोकॉर्पची आफ्रिकन सफारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक पातळीवर पंख पसरण्याच्या आक्रमक योजनांचा एक भाग म्हणून दुचाकी वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या हीरो मोटोकॉर्प लिमिटेडने आपला ‘हीरो’ ब्रँड थेट आफ्रिका बाजारपेठेत पोहोचवला आहे. कंपनीने आपल्या दुचाकी वाहनांची श्रेणी या बाजारपेठेत सादर करतानाच केनियामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील जुळवणी विभागदेखील स्थापन केला आहे. पुढील आठवड्यापासून कंपनी बुकिना फासो आणि आयव्हरी कोस्ट येथून कामकाज सुरू करणार आहे.

डॉन, स्प्लेंडर प्रो, ग्लॅमर, हंक, करिझ्मा या मोटारसायकली हीरो मोटोकॉर्प आफ्रिका बाजारपेठेत आणणार असून त्यासाठी केनियातील राइस ईस्ट आफ्रिका या कंपनीबरोबर भागीदारी करार केला आहे. याच कंपनीचा एक भाग असलेला समीर ग्रुप हा अधिकृत वितरक म्हणून काम पाहणार आहे. कंपनीच्या देशभरात विखुरलेल्या आऊटलेट्समधून या दुचाकींचे वितरण करण्यात येणार आहे.

समीर ग्रुपचे अध्यक्ष नौशाद मेराली आणि राइस ईस्ट आफ्रिकाचे अध्यक्ष समीर मेराली यांच्या उपस्थितीत ‘हीरो’ ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात लोकप्रिय मॅरेथॉन धावपटू अबेल किरुई आणि यंदाच्या ‘मिस केनिया’ किताब विजेत्या शमीन नेबिल यांनी हीरोच्या 100 सीसी स्टर्डी ‘डॉन’ आणि 125 सीसी ‘ग्लॅमर’ या मोटारसायकली सादर केल्या.

ब्रँड बिल्डिंग सुरू
हीरो ब्रँडच्या आफ्रिकेतील प्रवेशाला केनियापासून सुरुवात झाली आहे. केनियामध्ये दळणवळणाची नवीन साधने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या बाजारपेठेसाठी ब्रँड बिल्डिंग उपक्रम सुरू करण्यात येणार असून ‘हम में हैं हीरो’ या गीताची इंग्रजी आवृत्ती केनियातील रेडिओ स्टेशनवर सादर केली जाणार असल्याचे एमडी पवन मुंजाल यांनी सांगितले.