आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हीरो मोटोकॉर्पला जागतिक विस्ताराचे डोहाळे, जगभरात 20 उत्पादन केंद्र होणार सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दुचाकी बाजारपेठेतील अग्रणी हीरो मोटोकॉर्पने येत्या आठ वर्षांमध्ये 50 नवीन बाजारपेठांमध्ये ‘हीरो’ बनण्याचा विचार केला आहे. इतकेच नाही, तर संपूर्ण जगभरात 20 उत्पादन सुविधा उभारण्याबरोबरच वार्षिक उलाढाल 60 हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा आक्रमक संकल्प सोडला आहे.


महत्त्वाकांक्षी जागतिक विस्तार योजनेचा एक भाग म्हणून पुढील वर्षापर्यंत सर्व तिन्ही उपखंडांमध्ये सहा जुळवणी विभाग सुरू करण्याचे ठरवले असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पवन मुंजाल यांनी दिली.
कंपनीने यंदाच्या 31 मार्चअखेर 24 हजार कोटी रुपयांच्या उलाढालीची नोंद केली होती. आता ही उलाढाल 2020 पर्यंत 60 हजार कोटी रुपयांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले असल्याचे मुंजाल यांनी स्पष्ट केले.


आफ्रिकन सफारीची भरारी : केनियातील बाजारपेठेत मोटारसायकल आणून अलीकडेच आफ्रिका खंडात प्रवेश केलेल्या हीरो मोटोकॉर्पने आणखी नवीन बाजारपेठा पादाक्रांत करण्याचा विचार केला आहे. अगोदर कंपनीची निर्यात बाजारपेठ केवळ कोलंबिया (लॅटिन अमेरिका), श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या देशांपुरतीच मर्यादित होती. पुढील वर्षाच्या जानेवारी ते मार्च या कालावधीत आफ्रिका, कॅरेबियन, मध्य अमेरिका या ठिकाणी काही अतिरिक्त बाजारपेठा तयार करण्यात येणार आहे. कंपनीच्या प्रकल्पातून गुरुवारी 5 कोटीवी मोटारसायकल बाहेर पडली असून आता ही संख्या 10 कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षात स्कूटर आणि मोटरसायकलींचे वार्षिक उत्पादन 12 दशलक्षांपर्यंत नेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.


यंदा बारा वाहने आणणार :
मुंजाल यंदाच्या वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी 10 आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्ये हीरो ब्रँड आणणार असून पुढील वर्षात तिन्ही उपखंडांत सहा जुळवणी विभाग असतील, असा विश्वास मुंजाल यांनी व्यक्त केला. सप्टेंबरपासूनच्या
पुढील दोन तिमाहींमध्ये किमान बारा नवीन वाहने बाजारात आणण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.