आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hewlett Packard Starts Bend The Rules Scheme, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एचपीचे बेंड द रुल्स अभियान सुरु, दीपिका पदुकोण ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नियुक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हेवलेट पॅकर्ड (एचपी) इंडियाने शुक्रवारपासून देशात बेंड द रुल्स अभियानास सुरुवात केली आहे. पारंपरिक मार्ग न अवलंबता इतर मार्गाने यश मिळवणा-यांसाठी हे अभियान समर्पित करण्यात आले आहे. एचपीने यासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नियुक्त केले आहे. देशातील तरुणांना क्रिएटिव्हिटी, टॅलेंट आणि इनोव्हेशन यांची माहिती दीपिका यात देणार आहे.

यशप्राप्तीसाठी अनेकांनी आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर केला असेल, एचपी अशा यशकथा जाणून घेण्यासाठी अशा लोकांना याद्वारे निमंत्रित करत आहे. अशा व्यक्तींना आपला व्हिडिओ #BendTheRules हॅशटॅगसह फेसबुक, टि्वटर आणि यू ट्यूबद्वारे अपलोड करता येईल. पारंपरिक मार्ग न चोखाळता कशा प्रकारे यश मिळवले हे या व्हिडिओमध्ये असावे. देशातील विजेत्याला शॉर्ट फ‍िल्मद्वारे आपली प्रेरणादायी कथा मोठ्या प्रमाणात लोकांना सांगण्याची संधी मिळणार आहे. ही शॉर्ट फ‍िल्म तरुणाईत लोकप्रिय असणा-या बिंदास टीव्ही वाहिनीवर प्रसारित केली जाईल.

या अभियानात व्हॅल्यू पॅक्ड पीसी एचपी पॅव्हेलियन एक्स ३६० दाखवण्यात येणार आहे. हा नोटबुक ते टॅब्लेट असा सुलभरीत्या रूपांतरित करता येतो. यात ऑप्टिमाइज्ड टच स्क्रीन परफॉर्मन्स आणि बीट्स ऑडिओसारख्या सुविधा आहेत. उत्पादकता आणि मनोरंजनाच्या दृष्टीने हे ग्राहकांच्या गरजेनुरूप आहे.