आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत अद्रकाचे भाव गगनाला, कोथिंबीर तेजीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पावसामुळे अद्रक काढता येत नसल्याने बाजारात आवक घटली आहे. काही दिवसांपूर्वी 50 ते 70 रुपये किलो मिळणार्‍या अद्रकाने शंभरी पार केली आहे. मागील आठवड्यात गुरुवारी आणि रविवारी अद्रकाची 50 ते 55 क्विंटल आवक झाली. या आठवड्यात केवळ पाच ते सात क्विंटल आवक झाली. दैनंदिन येणारा इतर भाजीपाला काही प्रमाणातच कमी जास्त होत असला तरी त्याचे भाव स्थिर आहेत. दुष्काळामुळे भाजीपाला उत्पादनात 70 टक्के शेतकर्‍यांना फटका बसला होता. मात्र उर्वरित 30 टक्के शेतकर्‍यांकडे काही प्रमाणात पाणी होते. त्यांच्याकडील भाजीपाल्याची आवक सध्या होत आहे. काही शेतकर्‍यांकडे अद्रक आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी अद्रक लावलेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेतातील माल बाजारात विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे आठवड्यात 50 ते 55 क्विंटल आवक होत होती. एकाच वेळी जास्तीचा माल येत असल्याने या अद्रकाला किलोप्रमाणे 90 रुपयांपर्यंत भाव मिळाला. आता मात्र आवक घटल्याने अद्रकाने 130 रुपयांचा भाव नोंदवला आहे.

भाजीपाला भाव स्थिर
जून महिन्याचा पहिला आठवडा सोडल्यास इतर सर्व आठवड्यांत भाजीपाल्याच्या आवकमध्ये थोड्या प्रमाणातच चढ-उतार होत असल्याने याचे भाव केवळ एक-दोन रुपयाने कमी-जास्त होत आहेत. सर्व भाजीपाल्यांचे भाव स्थिर असले तरी याला कोथिंबीर अपवाद ठरली. कोथिंबिरीची आवक 50 टक्के घटल्याने दर 30 ते 40 रुपये मोठी जुडी पर्यंत गेले आहेत. पूर्वी हीच जुडी 10 ते 20 रुपयांना मिळायची.

पाऊस पडल्याने आवक घटली
या महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने दोन आठवड्यांपासून अद्रकाची आवक कमी झाली आहे. पावसाळ्यात अद्रक काढण्यात येत नाही. कमी आवकमुळे अद्रक वधारली.
- एस. एस. बनसोड, बाजार निरीक्षक