आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hitech Gadgets Which Are Used By Students During Exams

हायटेक कॉपीबहाद्दर वापरतात असे गॅजेट्स, कुणाचे आहे का लक्ष?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परीक्षा जवळ आल्‍या की विद्यार्थ्‍यांना टेन्‍शन येऊ लागते. बिकट परिस्थितीमध्‍ये अनेक विद्यार्थी देवाचाच धावा करतात. कोणी बजरंग बलीला नारळ चढ‍वतो. तर कोणी लाडवांचा प्रसाद देतो. काही जण कॉपी करण्‍यात वस्‍ताद असतात. या कॉपीबहाद्दरांकडे अनेक युक्त्या असतात. आता त्‍यांना तंत्रज्ञानाचीही साथ मिळाली आहे. अनेक हायफाय गॅजेट्स बाजारात उपलब्‍ध आहेत. त्‍यांचा वापर करुन कॉपी करणारे संधी साधू शकतात.

इंटरनेटवर एक वेबसाईट कॉपीबहाद्दरांना मदत करण्‍यासाठीच बनलेली आहे. तिथे कॉपी करण्‍यासाठी विद्या‍र्थ्‍यांना वापरता येईल, असे अनेक गॅजेट्स आहेत. कॉपी करण्‍यासाठी मदत करणे, हेच या साईटचे काम आहे. कॉपी करुन परीक्षेत उत्तीर्ण होणे चुकीचे आहे. अभ्‍यास केलाच पाहिजे. विद्यार्थी नव्‍या युक्त्या काढत आहेत. परंतु, त्‍यांच्‍यावर मात करण्‍यासाठी कॉपी बहाद्दरांना पकडणा-यांना या साईटवरुन काही टीप्‍स नक्‍कीच मिळतील.

कशा प्रकारचे गॅजेट्स वापरण्‍यात येतात कॉपी करण्‍यासाठी, वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...