आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा सुरू होणार एचएमटीची टिक्टिक्; लँबे्रटा स्कूटरही पुन्हा धावणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील डबघाईस आलेल्या पाच कंपन्यांच्या पुनरुद्धारासाठी केंद्र सरकार 4,575 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या योजनेवर गंभीरपणे विचार करत आहे. यात लखनऊतील स्कूटर्स इंडिया या विस्मरणात गेलेल्या कंपनीचाही समावेश आहे. याशिवाय एचएमटी लिमिटेड, एचएमटी बेअरिंग्ज, एचएमटी वॉचेस, वृत्तपत्राचा कागद बनवणारी नेपा, नागालँड पल्प अँड पेपर मिल्स या कंपन्यांना पुनरुज्जीवन देण्यासाठी त्यात पुन्हा गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे. अवजड उद्योग मंत्रालयाच्या एका वक्तव्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांना पुन्हा चालना देण्यासाठीचे प्रस्ताव मंजुरीच्या विविध टप्प्यांत आहेत.
सर्वाधिक 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक एचएमटी वॉचेसमध्ये करण्याची योजना आहे. यानंतर 1,292 कोटी रुपये नेपा लिमिटेड, 992 कोटी रुपये एचएमटी लिमिटेड, 679 कोटी नागालँड पल्प अँड पेपर कंपनी व एचएमटी बेरिंग्जमध्ये 112 कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव आहे. स्कूटर्स इंडिया लिमिटेड प्रकरणात सरकारने आपले धोरण बदलले आहे. यानुसार ही कंपनी विक्रीत काढण्याऐवजी त्यात पुनर्गूंतवणूक करून पुनरोद्धार करण्यात येईल. मात्र यासाठी किती गुंतवणूक करण्यात येईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. लँब्रेटा स्कूटर या ब्रॅँडसाठी स्कूटर इंडिया कंपनी लोकप्रिय होती.