आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह, वाहन कर्ज स्वस्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तिसरे तिमाही पतधोरण मंगळवारी जाहीर केले. त्यात रेपो रेट व रोख राखीव निधीमध्ये (सीआरआर) प्रत्येकी 0.25 टक्के कपात केली. रेपो दर 7.75 टक्के, तर सीआरआर 4 टक्के झाला. रेपो दरातील कपातीमुळे गृह, वाहन व इतर कर्जे स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयानंतर आयडीबीआय, एनएचबीई यांनी मूळ व्याजदरात पाव टक्के कपात केली.

रेपो दरात नऊ, तर सीआरआरमध्ये तीन महिन्यांनंतर कपात झाली आहे. सीआरआर कपातीने अर्थव्यवस्थेत 18,000 कोटी रोखता येऊ शकते. नवे व्याजदर 9 फेब्रुवारीपासून लागू होतील.
ग्राहकांचा होणार फायदा
रेपो दरातील 0.25 टक्के कपातीमुळे विविध बँकांनी गृह, वाहन व इतर कर्जावरील व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. कपात लक्षात घेता गृहकर्जाचा ईएमआय स्वस्त होईल.