आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांची मागणी वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने प्रमुख व्याजदर कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे रिअल इस्टेट उद्योगाने स्वागत केले असून यामुळे घरांची मागणी वाढून मरगळलेल्या मालमत्ता बाजारातील वातावरण बदलण्यास प्रोत्साहन मिळेल, असे मत आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सने व्यक्त केले आहे; परंतु व्याजदरात आणखी कपात करण्याचा सूरदेखील आळवण्यात
आला आहे.

रिअॅल्टी क्षेत्रासाठी नववर्षाची भेट
रिझर्व्ह बँकेने नव्या वर्षाची ही चांगली भेट दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचे मन वळवण्याच्या वित्तमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. छोट्या व्याजदर कपातीने का होईना पण भारतीय अर्थव्यवस्थेबद्दलच्या आशा उंचावण्याचे हे चांगले संकेत आहेत. नवीन घरांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता खरेदीदारांना प्रोत्साहन मिळेल.
राजीव तलवार, कार्यकारी संचालक, डीएलएफ ग्रुप

वर्षाच्या सुरुवातीलाच हा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. बाजारातील सध्याची स्थिती बघता घर खरेदीची मानसिकता उंचावण्याच्या दृष्टीने व्याजदर कपात हे महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे तारण दरदेखील कमी होण्याची आशा असून देशभरात निवासी घरांच्या विक्रीत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
अंशुमन मॅग्झिन, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय
संचालक, सीबीआरई

रिझर्व्ह बँकेने एक चांगली सुरुवात केली असली तरी ती पुरेशी नाही. अल्प कालावधीत व्याजदरात दोन टक्क्यांनी कपात होण्याचे गरजेचे आहे.
ललितकुमार जैन, अध्यक्ष, क्रेडाई

चांगले पाऊल पडले असले तरी या तिमाहीत आणखी आक्रमक व्याजदर कपात होण्याची मालमत्ता उद्योगाला आशा आहे.
गेटांबर आनंद, अध्यक्ष (निवडून आलेले), क्रेडाई

यानंतर होणा-या अनेक व्याजदर कपातीपैकी ही पहिली असून ती घर खरेदीदारांसाठी निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.
अनुज पुरी, अध्यक्ष, जेएलएल इंडिया

कमी मागणी आणि इन्व्हेंटरीचे वाढते प्रमाण यामुळे गेल्या तीन तिमाहींपासून रिअॅल्टी क्षेत्र अडचणीतून वाटचाल करीत आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे ईएमआय कमी होण्यास मदत होऊन त्याचे रूपांतर घर खरेदी व्यवहारात होईल.
प्रदीप जैन, पार्श्वनाथ डेव्हलपर्स

उद्योग जगतात व्याजदर कपातीचे स्वागत
पुढच्या काळातील व्याजदर कपातीची ही नांदी आहे; परंतु यामुळे आता बँकांनाही आपले व्याजदर कमी करता येणे शक्य होणार आहे.
ज्योत्स्ना सुरी, अध्यक्ष, फ‍िक्की.

गुंतवणूकदारांची मानसिकता उंचावण्यास मदत होऊ शकेल. व्याजदर कपातीमुळे गुंतवणूक मागणीला गती मिळून ग्राहकांची गृहोपयोगी वस्तूंची खरेदी वाढून बांधकाम क्षेत्रालाही चालना मिळण्यास मदत होऊ शकेल. चंद्रजित बॅनर्जी,
महासंचालक, सीआयआय.