आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच! चांगले दिवस येणार; गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्याचे नव्या सरकारचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई / औरंगाबाद- सर्वांच्या अपेक्षा घेऊन नवे सरकार नवी दिल्लीच्या तख्तावर अस्तित्वात आले. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भरभरुन मते देऊन निवडून दिलेल्या मोदी सरकारच्या शिलेदारांनी अर्थात मंत्र्यांनी कामाला सुरुवात केली. नवे नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृहकर्जावरील व्याज दर कपातीचे संकेत दिले आहेत. रसायनमंत्री अनंत कुमार यांनी जीवनावश्यक औषधांच्या किमती 25 ते 40 टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले. तर भारतीयांना भूरळ पाडणारे सोने आता बºयापेकी स्वस्त झाले आहे. त्यामुळे आगामी काळात खरेच चांगले दिवस येतील असे चित्र सध्या तरी आहे.
घर खरेदीसाठी अच्छे दिन
नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच गृहकर्जावरील व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता नवीन घर खरेदी करण्यासाठी लवकरच ‘अच्छे दिन’ येणार, अशी आशा करायला हरकत नाही. देशातील नागरिकांना 2020 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे लक्ष्य गाठायचे असेल तर व्याजदर कमी करणे गरजेचे असल्याचे नायडू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. घरांना आमच्या दृष्टीने सर्वाधिक प्राधान्य असून यासंदर्भात माझे सहकारी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी बोलणार आहे. गृहकर्जाचे व्याजदर कमी करण्यासाठी आम्ही हस्तक्षेप करू, असेही ते म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील त्या वेळच्या एनडीए सरकारनेदेखील घरांना प्राधान्य दिले होते. त्या वेळी व्याजदर 11 टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले होते; पण आता पुन्हा व्याजदर 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

पुढील स्लाइडमध्ये, सोने 28 हजारांखाली