मुंबई - परवडणा-या घरांना गृहकर्ज पुरवठा करण्यासाठी आता पुन्हा एकदा कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. टाटा कॅपिटल, पीएनबी हाउसिंग या कंपन्यांनी ग्रामीण भागात तसेच महिलांना कर्ज पुरवठा करण्यासाठी कंबर कसली आहे.
टाटा कॅपिटल हाउसिंग फायनान्स िलमिटेडने िवशेषकरून दुस-या व तिस-या श्रेणीतील शहरे, िनमग्रामीण तसेच शहरातील गरीब वर्गाला कर्ज सेवा देण्यावर भर िदला आहे. परवडण्याजोग्या घरांच्या ग्राहकांना
आपल्या स्वप्नातील घरे विकत घेता यावीत यासाठी कंपनीने विशेष योजना राबवण्याचे ठरवले आहे.
स्पर्धात्मक व्याजदर, ग्राहकांना सोयीस्कर ठरतील अशा लवचिक सुविधा, विनासायास प्रक्रिया ही या योजनांची खास वैशिष्ट्ये असतील. या वर्गातील ग्राहकांच्या गृहकर्जविषयक गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी ५० ठिकाणांचा समावेश असलेली विशेष संरचना कंपनीने स्थापन केली आहे.