आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home, Vehicle Loan Installment Hike, Reserve Bank Monetary Policy Effect

गृह, वाहन कर्जाचा हप्ता महागणे शक्य, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पतधोरणात रेपो दरात पाव टक्का वाढ केली. गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी महागाई नियंत्रणाला महत्त्व देत रिव्हर्स रेपो दर व एमएसएफ दरात प्रत्येकी पाव टक्का वाढ केली. यामुळे गृह, वाहन कर्जासह इतर कर्जाचा हप्ता महागण्याची शक्यता आहे. राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँकांनी व्याजदर वाढवल्यास गृह, वाहन, वैयक्तिक कर्जाचा ईएमआय वाढू शकतो.
रेपो, रिव्हर्स रेपोत वाढ
रेपो रेट : आरबीआयकडून व्यापारी बँकांनी घेतलेल्या कर्जाचा व्याजदर.
पूर्वी : 7.75 टक्के आता : 8.00 टक्के
रिव्हर्स रेपो रेट : व्यापारी बँकांच्या आरबीआयकडील निधीवरील व्याज.
पूर्वी : 6.75 टक्के आता : 7.00 टक्के
दोहोंमधील प्रत्येकी वाढ : 0.25 टक्के
कर्ज कालावधी संभाव्य वाढ
05 लाख पाच वर्षे 71 रुपये
10 लाख 10 वर्षे 141 रुपये
20 लाख 20 वर्षे 337 रुपये
30 लाख 30 वर्षे 506 रुपये