आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडाची नवीन जॅझ येणार पुढच्या वर्षात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन उद्योगातील मंदीच्या वातावरणाची तमा न बाळगता सेडन प्रकारातील ‘अमेझ’ मोटार दाखल केल्यानंतर आता होंडा कार्स इंडिया संपूर्ण नव्या रूपातील जॅझ मोटार बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. पुढच्या वर्षात टोकियोमध्ये होणार्‍या मोटार प्रदर्शनात नवीन जॅझ सर्वप्रथम सादर केल्यानंतर 2014 मध्ये या मोटारीचे आगमन होणार असल्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

नव्या पिढीतील ‘जॅझ’चे उत्पादन करण्यासाठी कंपनीने बाजारातील विद्यमान ‘जॅझ’ या हॅचबॅक मोटारीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात ‘होंडा सिव्हिक’ची बाजारपेठही आटली आहे. त्यामुळे या दोन्ही मोटारींचे उत्पादन तात्पुरते थांबवण्यात आले असल्याचे होंडा कार्स इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष जनेश्वर सेन यांनी सांगितले.

य अगोदरची ‘होंडा सीआरव्ही’ ही मोटार जपान येथून आयात करण्यात यायची; परंतु आता कंपनीने ‘सीआरव्ही’वर अधिक लक्ष केंद्रित करताना या मोटारीची जुळवणी भारतातच सुरू करण्यात येणार असल्याचे क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने जागा तसेच उत्पादन निर्मितीच्या दृष्टीने तडजोड करावी लागणार आहे. वास्तविक जॅझ ही दीर्घकाळापासून चांगली कामगिरी करीत असतानादेखील या मोटारीचे उत्पादन तात्पुरते बंद करण्याचा सावध निर्णय घेतला असल्याचे सांगितले. गेल्या संपूर्ण वर्षात जॅझची विक्री अंदाजे 6 हजारांच्या आसपास झाल्याचे त्यांनी सांगितले.