आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडा अमेझच्या किमतीत वाढीची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जपानमधील ऑटो क्षेत्रातील आघाडीची कंपनी होंडाच्या अमेझ या एंट्री लेव्हल सेडान कारला चांगले यश मिळाले. त्यामुळे कंपनी लवकरच अमेझच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. होंडा अमेझला लाँचिंगनंतरच्या पहिल्या आठवड्यातच 10 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे.

फीचर आणि स्पेसिफिकेशन्समध्ये स्पर्धकांच्या पुढे
फीचर्स आणि इंजिन स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत अमेझ आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा उजवी आहे. येत्या काही दिवसांत डिझेल अमेझसाठी प्रतीक्षा कालावधी सहा महिन्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मागणीतील ही वाढ लक्षात घेऊन कंपनी किमती वाढवण्याबाबत विचार करत आहे.

सध्या डिझेल अमेझसाठी चार महिने, तर पेट्रोल अमेझसाठी तीन महिने वेटिंग आहे.

काही हजारांनी वाढणार किंमत
होंडाच्या अधिका-यांनी सांगितले, येत्या काही आठवड्यांत अमेझच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमेझ महागली तरी या कारची मागणी कायम राहील, असे त्या अधिका-याने स्पष्ट केले.