आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होंडा अमेझ देणार सर्वाधिक मायलेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमेझ या होंडाच्या नव्या कारचे मायलेज 26 किलोमीटर प्रतिलिटर राहील. ही होंडाची पहिली डिझेल कार आहे. सर्वाधिक मायलेजच्या जोरावर अमेझ भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करेल, अशी अपेक्षा होंडाने व्यक्त केली. अमेझमध्ये क्रांतिकारी आय-डीटीईसी या तंत्राचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे या कारचे मायलेज चांगले वाढले आहे.

सध्या टाटा मोटर्सची इंडिगो ईसीएस आणि शेवरलेची बीट हॅचबॅक भारतीय बाजारात सर्वाधिक मायलेज देणा-या कार मानल्या जातात. दोन्ही कार एक लिटर डिझेलमध्ये 25.4 किलोमीटर मायलेज देतात. अमेझ 1500 सीसी इंजिनासह सुमारे 100 पीएस पॉवर किंवा 300 एनएम टॉर्क देते. श्रेणीतील ही सर्वात वेगवान कार असेल. या श्रेणीतील मारुती डिझायरमध्ये 1248 सीसीसह 190 टॉर्क एमएम आहे.

किमतीची घोषणा 11 रोजी
होंडा कारचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) जनेश्वर सेन यांनी सांगितले, अमेझ देशातील पहिली अ‍ॅल्युमिनियम इंजिनची कार आहे. ही इंधन कार्यक्षम आणि शक्तिशाली कार आहे.
भारतीय ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. चार मीटरपेक्षा कमी लांबी असलेली ही कार मारुती डिझायरशी स्पर्धा करील. 6 ते 8.5 लाख रुपयांच्या श्रेणीत आणखी काही ब्रँड्सही अमेझच्या स्पर्धेत आहेत. अमेझच्या किमतीबाबत 11 एप्रिल रोजी घोषणा होणार असल्याचे सेन यांनी स्पष्ट केले.