आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडा, ह्युंदाईच्या कार महागल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारने बोर्ड डायग्नोस्टिक (कारच्या विविध पार्ट्सची स्थितिदर्शक ) निकषांमध्ये केलेल्या बदलामुळे अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या होत्या. सोमवारी त्यात होंडा आणि ह्युंदाई कंपन्यांची भर पडली. होंडा कारच्या किमती 1000 ते 10,000 रुपयांपर्यंत वाढणार आहेत. तर, ह्युंदाई कार 572 ते 2,830 रुपयांनी महागणार आहेत. होंडा कार्स इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, हॅचबॅक ब्रिओ कार 2000 रुपयांनी, सिटी सेडान कार 3000 रुपयांनी महागणार आहे. अकॉर्ड कारची किमत 5000 रुपयांनी तर सीआर-व्ही एसयूव्हीची किमत एक हजार रुपयांनी वाढणार आहे. ह्युंदाईने दिलेल्या माहितीनुसार, ई-ऑन कार 2500 रुपयांनी, सँट्रो 2830 रुपये, आय-10 कार 600 ते 900 रुपयांनी , आय-20 कार 575 रुपयांनी महागणार आहे. तर व्हेर्ना 1340 रुपयांनी, एलांट्रा 1740 रुपयांनी आणि एसयूव्ही सँटा एफई कार 2,813 रुपयांनी महागणार आहेत.