पॅरिस - पॅरिस येथे भरलेल्या वाहन प्रदर्शनात
होंडा कंपनी एचआर-व्ही ही स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल (एसयूव्ही) कार सादर करणार आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या श्रेणीत होंडा आता एचआर-व्हीच्या माध्यमातून युरोप आणि अमेरिकेतील बाजारपेठांतील मागणी पूर्ण करण्याची तयारी करत आहे. हे ऑटो प्रदर्शन ४ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर या काळात सुरू राहील. फॉक्सवॅगन, मर्सिडीझ आणि फियाट यासारख्या जगातील दिग्गज कंपन्यांचा यात सहभाग राहील.
फ्रान्सची पिजॉट-सिट्रॉन आणि रेनॉही नव्या कार सादर करणार आहे. दीर्घकालीन मंदीनंतर यंदा युरोपात नव्या कारची विक्री ६ टक्के दराने वाढत आहे.
जगातील बहुतांश ऑटो कंपन्या
आपल्या नव्या कार सादर करणार
भारतातील लक्झरी कारप्रेमींची पॅरिस ऑटो प्रदर्शनावर नजर
पुढील स्लाईडवर वाचा, इतर माहिती