आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW: होंडाने लॉंच केली एक लिटरमध्ये 74 किमी धावणारी स्वस्त बाईक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रणी कंपनी होंडाने भारतीय बाजारपेठेत कमी किंमतीची बाईक लॉंच केली आहे. 'प्राईस वॉर' छेडण्‍याच्‍या हेतूने सादर करण्‍यात आलेली ड्रीम निओला 110 सीसीचे इंजिन लावण्‍यात आले आहे. एंट्री सेगमेंटच्‍या या बाईकची किंमत कंपनीने 46 हजार रूपये इतकी ठेवली आहे.

एक लिटर पेट्रोलमध्‍ये 74 किमी मायलेज देणारी ही बाईक 8.2 बीएचपी पॉवरची आहे. उल्‍लेखनीय म्‍हणजे ड्रीम निओ एंट्री सेगमेंटमधील होंडाची तिसरी बाईक आहे. यापूर्वी कंपनीने ड्रीम युगा सादर वाहनक्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.