आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HONDA ने लॉन्च केली MOBILIO 7 सीटर कार, कार देणार 24.2Kmpl अ‍ॅव्हरेज - कंपनीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जापानची अग्रगण्य कार निर्माता कंपनी होंडाने आपली मल्टी पर्पज व्हेइकल (एमपीव्ही) कार मोबीलियो लॉन्च केली आहे. या कारची आसनक्षमता 7 सीटर एवढी असून किंमत 6.49 - 10.86 लाख रुपयांदरम्यान (एक्‍स शो रूम किंमत) ठेवण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीने या कारला ऑटो एक्सपोच्या माध्यमातन जगासमोर आणले होते.

अ‍ॅव्हरेज आहे विशेष बाब
याच प्रकारातील इतर कारांमध्ये मोबिलियोची तुलना केली तर या कारची अ‍ॅव्हरेज, विस्तृत जागा आणि शक्तीशाली इंजिन ही जमेची बाजू ठरेल. याशिवाय या कारचे डिझाईनही उत्कृ्ष्ठ आहे. मल्टी युटीलीटी व्हेइकल असण्यासोबतच ही एक उत्तमप्रतीची 7 सीटर कौटुंबिक कार आहे. मोबिलियोमध्ये दोन प्रकार आहेत. यामध्ये एक 1.5 लिटर I-VTEC पेट्रोल आणि दूसरा 1.5-लीटर I-VTEC डिझेल असा प्रकार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार याचे डिझेल इंजिन असलेले मॉडेल प्रतिलिटर 24.2Km चे अ‍ॅव्हरेज देते. या प्रकारच्या गाड्यांमध्ये मोबिलियोसाठी ही एक महत्त्वाची बाब आहे. तर, पेट्रोल इंजिन प्रकारातील कार प्रतिलिटर 18.2Km एवढे अ‍ॅव्हरेज देते.
होंडा मोबिलियोची किंमत (एक्स शोरूम किंमत, दिल्ली)
Honda Mobilio ई पेट्रोल - Rs. 6.49 लाख
Honda Mobilio E डिझेल - Rs. 7.89 लाख
Honda Mobilio S पेट्रोल - Rs. 7.50 लाख
Honda Mobilio S डीजल - Rs. 8.60 लाख
Honda Mobilio V पेट्रोल - Rs. 8.77 लाख
Honda Mobilio V डिझेल - Rs. 9.76 लाख
Honda Mobilio RS (फक्त डिझेल) - Rs. 10.86 लाख

प्लॅटफॉर्म
होंडाने या कारमध्ये ब्रिओच्या प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. कार तज्ज्ञांच्यामते एमपीव्ही सेक्शनमध्ये बाजारात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा होंडाचा हा प्रयत्न थोडा जोखमीचा आहे. कारण येथे या प्रकारातील गाड्यांचा वापर जास्तकरून टॅक्सीच्या रुपात केला जातो. याशिवाय अनेक कंपन्यांनी या प्रकारात आपले मजबूत बस्तान वसवले आहे. यामध्ये टोयोटाची इनोव्हा, महिंद्राची झायलो, मारूतीची अर्टीगा, निस्सानची इवालिया आणि शोरलेची एन्जॉय इत्यादी प्रमुख कार आहेत. आता याच यादीत पुढील नाव होंडाच्या मोबिलियोचे असणार आहे.

पाहूयात या कारमधील इतर महत्त्वाच्या बाबी
- या कारचे ग्राउंड क्लियरेंस 189 मिमीचे आहे. मात्र लो फ्लोअर आणि उघडणार्‍या दरवाज्यांमुळे ही कार वरिष्ठ नागरिकांना आरामदायक प्रवास घडवू शकते.

- या कारची एकूण लांबी 4.4 मीटर आहे, ही लांबी आर्टीगापेक्षा थोडी जास्त तर इनोव्हापेक्षा थोडी कमी आहे.
-15 इंचाचे चाक, ज्यांचे व्हिलबेस 2650 एमएमचे आहे. मात्र, याचे प्रतिस्पर्धी आर्टीगा आणि शोरलेमध्ये यापेक्षा जास्त व्हिलबेस आहे. जे अनुक्रमे 2740 एमएम आणि 2720 एमएम असे आहे.
-कारच्या चेहर्‍यात होंडाच्या इतर मॉडेल ब्रायो आणि अमेझची झलक दिसते. एक वेगळा लूक देण्यासाठी होंडाच्या डिझायनर्सने ययामध्ये जाड क्रोम ग्रिल, उघडणार्‍या छताचा वापर केला आहे.
- कंपनीने दावा केला आहे की, या कारमध्ये उत्तम प्रकारचे अलॉय व्हिल्स आणि एलईडी टर्न इंडिकेटर लावण्यात आले आहेत. रेअर व्ह्यू खुपच कॉम्पॅक्ट आहे, तर टेल लॅम्प खुप मोठे आहेत. या कारचे ग्राऊंड क्लेअरन्स 185 मिमी आहे.
जर पेट्रोल इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास तर हे 1.5 लीटर i-VTEC असे आहे, या प्रकारचे इंजिन मोबिलियोसारख्या मोठ्या कारसाठी उपयुक्त आहे. यामध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स, 119 पीएसचे उच्चतम क्षमता आणि 145 एनएमचा टॉर्क देण्यात आला आहे.

पुढील स्लाईडमध्ये पाहा - होंडा मोबिलियोची या प्रकारातील इतर कारांसोबतची तुलना आणि आतील छायाचित्रे