आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होंडाची \'अमेज\' सगळ्यांना ओव्हर टेक करणार; एक लिटरमध्ये धावेल 26 KM

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानची कार निर्माता कंपनी 'होंडा'ने आपली पहिली डीझेल इंजिन कार भारतात सादर केली आहे. मारुतीच्या 'स्विप्ट डिझायर'ला टक्कर देण्यासाठी होन्डाने 'अमेज' कार भारतीय बाजारात उतरवली आहे. नवी दिल्‍लीत गुरुवारी होंडाची अमेज लॉन्‍च करण्यात आली. 'अमेज' ही ऑटोमॅटिक व्हर्जनमध्येही उपलब्ध होणार आहे. अमेज ही सर्वाधिक मायलेज देणारी कार असून एक लिटर डिझेलमध्ये ही कार 26 किमी धावणार असल्याचा दावा होंडाने केला आहे.

सध्या टाटा मोटर्सची इंडिगो eCS आणि शेवरलेची बीट हॅशबॅक ही सर्वात जास्त मायलेज देणारी कार ठरली होती. डिझेलवर चालणार्‍या या कार 25.4 किमी प्रति लिटर मायलेज देतात. परंतु होंडाची 'अमेज' या दोन्ही कारर्सला ओव्हर टेक करणार आहे.

डिझायरमध्ये 4- स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे तर, ब्रियो अमेजचे 5- स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असेल. होंडाची नवी कार 1.5 लिटर i-DTEC डिझेल इंजिनसोबत लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने अमेजच्या डिझेल मॉडेलची किंमत 5.99 लाख रुपये तर पेट्रोल मॉडेलची किंमत 4.99 लाख रुपये एवढी आहे.