आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honda Motorcycle Launches ACTIVA I; Priced At Rs 44,200

आला ‘कॉम्पॅक्ट’ स्कूटर्सचा जमाना, ‘अ‍ॅक्टिव्हा - आय’ सादर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- रोजच्या वाहतूक कोंडीतून सहज मार्ग काढू शकणारी आकाराने लहान, वजनाने हलकी आणि चालवण्यास सहज सुलभ स्कूटर हवीहवीशी वाटणा-यांसाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर्स इंडियाने ‘अ‍ॅक्टिव्हा - आय’ ही नवी स्कूटर बाजारात दाखल केली आहे. विशेष म्हणजे ‘अ‍ॅक्टिव्हा - आय’च्या माध्यमातून कंपनीने पहिल्यांदाच आता कॉम्पॅक्ट स्कूटरच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. ही स्कूटर जूनअखेर बाजारात उपलब्ध होणार आहे.


होंडाच्या आतापर्यंत मोटो स्कूटर आणि फॅमिली स्कूटर या दोन गटांमध्येच आतापर्यंत उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु आता ‘पर्सनल’ आणि ‘कॉम्पॅक्ट’ स्कूटरच्या बाजारात आपले स्थान भक्कम करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.अत्यंत स्टायलिश डिझाइन असलेल्या या स्वयंचलित स्कूटरमध्ये ‘होंडा इको टेक्नॉलॉजी’ या तंत्राचा वापर करण्यात आल्याने ती प्रतिलिटर 60 किलोमीटरचे मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. गिअर नसलेल्या या स्कूटरला 110 सीसी क्षमतेचे इंजिन बसवण्यात आले आहे. वाहन बाजारपेठेत होंडाच्या डीओ, अ‍ॅक्टिव्हा आणि अ‍ॅव्हिएटर या तीन स्कूटर उपलब्ध आहेत. 110 सीसीचे इंजिन असलेल्या या स्कूटर्स 44,718 ते 53,547 रुपयांदरम्यान बाजारात उपलब्ध आहेत. स्कूटर बाजारपेठेत कंपनीचा 50 टक्के बाजार हिस्सा आहे. सियामने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीत देशातील स्कूटर विक्रीमध्ये महिन्यात 13.06 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


नव्या अ‍ॅक्टिव्हाचे फीचर्स
पारंपरिक ब्रेक्सच्या तुलनेत ब्रेकिंगचे अंतर 24 टक्क्यांनी कमी
ट्यूबलेस टायर, देखभालमुक्त बॅटरी.
वजन 103 किलो असल्याने स्त्रियांना चालवणे सोपे
अर्गोनॉमिक ग्रॅब रेलमुळे स्कूटर स्टँडवर लावताना 15 टक्के कमी ताकद लागते.
चार रंगांमध्ये उपलब्ध : बेज मेटॅलिक, सनबिम व्हाइट, अल्फा रेड मॅटेलिक, पर्पल मेटॅलिक


किंमत
44,200 रुपये, एक्स शोरूम, दिल्ली.


लॉंचिंगची छायाचित्रे पाहण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...