Home »Business »Auto» Honda's Amez Coming : Jaz Motor Production ,Seal Tempararial Break Down

होंडाची अमेझ सेडन येणार : ‘जॅझ’ मोटारीचे उत्पादन, विक्रीला तात्पुरता ब्रेक

प्रतिनिधी | Feb 23, 2013, 08:43 AM IST

  • होंडाची अमेझ सेडन येणार :  ‘जॅझ’ मोटारीचे उत्पादन, विक्रीला तात्पुरता ब्रेक

मुंबई - मोटार निर्मितीत आघाडीवर असलेल्या जपानमधील होंडा या कंपनीने आपल्या हॅचबॅक प्रकारातील जॅझ या मोटारीचे उत्पादन आणि विक्री एप्रिलपासून तात्पुरत्या कालावधीसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षाच्या प्रारंभी नवीन मोटार बाजारात आणण्याचा विचार केला आहे.

होंडा कंपनी एप्रिल महिन्यात अमेझ ही नवी सेडन मोटार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टीने पुरेशा प्रमाणात मोटारींचे उत्पादन करण्यासाठी कंपनीने जॅझचे उत्पादन थांबवण्याचे पाऊल उचलले आहे. मार्च महिन्यानंतर सध्याच्या होंडा जॅझ मोटारीचे उत्पादन थांबवण्यात येणार असून पुढील वर्षात नव्या पिढीतील जॅझ मोटार बाजारात आणण्याची योजना असल्याचे होंडा कार्स इंडिया लि.च्या (एचसीआयएल) प्रवक्त्याने सांगितले. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या जॅझ मोटारीचे यापुढे बुकिंग स्वीकारण्यात येणार नाही, असेही या प्रवक्त्याने सांगितले. होंडा जॅझची बाजारातील सध्याची किंमत 5.99 लाख ते 6.56 लाख रुपयांच्या (एक्स शोरूम दिल्ली) दरम्यान आहे. 2011 मध्ये कंपनीने किंमत 1.6 लाख रुपयांनी कमी केल्यानंतर या मोटारीला ग्राहकांकडून लक्षणीय प्रतिसाद मिळत होता. जॅझंचे उत्पादन आणि विक्री तात्पुरती थांबवण्यामागील हेतू विशद करताना कंपनीच्या अधिका-याने सांगितले की, यंदाच्या वर्षात आलेल्या नवीन मोटारींमुळे ग्रेटर नोएडा प्रकल्पातील उत्पादनाच्या स्वरूपात बदल झाला आहे. नवीन मोटारसायकलीला बाजाराकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मागणीनुसार बदल करण्याचा विचार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

एप्रिल महिन्यात एचसीआयएलने आपले पहिले डिझेल मॉडेल बाजारात आणण्याची योजना आखली आहे. प्रवेश पातळीवरील हे सेडन वाहन लहान मोटारीसाठी देण्यात येणा-या अबकारी शुल्काच्या लाभास पात्र असेल. ही मोटार सध्या बाजारात भक्कम स्थान निर्माण केलेल्या मारुती सुझुकीच्या डिझायरला थेट टक्कर देणार आहे.

Next Article

Recommended