आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honeymoon Package Launch To Airways Company For Marriage Couple

लग्नसराई कॅश करण्यासाठी विमान कंपन्यांकडून ‘मधुचंद्र पॅकेज’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मॉरिशस, मलेशिया, थायलंडसारख्या देशांमध्ये जाऊन मधुचंद्र साजरा करण्याची स्वप्ने साकार करण्यासाठी विमान कंपन्यांनी ‘विशेष भाड्याचा’ चंद्र नवदांपत्याला देण्याची योजना आखली आहे. लग्नसराई हंगाम सुरू झाल्याने तो आता ‘कॅश’ करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
दुबईस्थित एमिरट्स या कंपनीने भारतीय नवदांपत्यांना हनिमून प्रवासाची विशेष भेट म्हणून विमान भाड्यात 20 टक्के सवलत देऊ केली आहे. मलेशियातील ‘एअर एशिया’ने तर लॅँगकावी, बाली, फुकेट आणि क्वालालंपूरमध्ये यावे यासाठी प्रोत्साहनपर भाड्याच्या पायघड्या या नवदांपत्यांसाठी घातल्या आहेत.
मॉरिशस, केपटाऊन, लंडन, पॅरिस, झुरिच, न्यूयॉर्क आणि फ्रॅँकफर्ट यासह आणखी 20 निवडक ठिकाणांना जाण्यासाठी चार ते सात डिसेंबरदरम्यान विमानांचे बुकिंग उपलब्ध करून दिले. या बुकिंगवर 31 मार्च 2014 पर्यंत प्रवास करता येऊ शकणार असल्याचे एमिरट्सने म्हटले आहे.
भारतात सुरू झालेला लग्नसराईचा हंगाम आणि नवदांपत्यांची हनिमूनला कोठे जायचे याबाबत सुरू झालेले ‘प्लॅनिंग’ लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून दिल्याचे एमिरट्सचे भारत आणि नेपाळ विभागाचे उपाध्यक्ष एस्सा सुलेमान अहमद यांनी सांगितले.
एअर एशियादेखील लवकरच आपली स्थानिक सेवा सुरू करीत आहे. त्यामुळे क्वालालंपूर येथून लॅँगकावी, बाल, फुकेटसारख्या ‘रोमॅँटिक हनिमून’ ठिकाणी नवपरिणीत जोडप्यांनी जावे यासाठी खास प्रोत्साहनपर भाडे देऊ केले आहे.
विविध पॅकेज : मॉरिशस, मलेशिया, थायलंडकडे कल
> नवदांपत्यांना नवीन वर्षात 6 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत प्रवास करण्यासाठी विमान तिकिटांचे बुकिंग 15 डिसेंबरपर्यंत करता येऊ शकेल, असे विमान कंपन्यांनी म्हटले आहे.
>कोची, कोलकाता, तिरुचिरापल्ली येथून क्वालालंपूरला जाण्यासाठी विमान कंपन्यांनी एकमार्गी प्रवासासाठी पाच हजार रुपये विमान भाडे ठेवले आहे. चेन्नई किंवा बंगळुरू येथून मलेशियाला जाण्यासाठी एक मार्गी प्रवासासाठी 6 हजार 500 रुपये भाडे ठेवले आहे. इतकेच नाही तर नवदांपत्यांना मलेशियातील लॅँगकावी, बाली आणि फुकेटची सफर घडवण्यासाठी अवघे 2,999 रुपये भाडे (क्वालालंपूर येथून एकमार्गी प्रवासासाठी) देऊ केले आहे.