आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hope Of Interest Rate Cut Down Purching Activity Increase;sensex 20103.53

व्याजदर कपातीच्या आशेने बाजारात खरेदीवर जोर ; सेन्सेक्स 20,103.53 अंशावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मारुती सुझुकीने तिस-या तिमाहीत केलेली चांगली आर्थिक कामगिरी आणि रिझर्व्ह बॅँकेकडून व्याजदर कमी होण्याची पुन्हा निर्माण झालेली आशा यामुळे बाजारात झालेल्या जोरदार खरेदीत व्याजदर संवेदनशील समभागांना मागणी येऊन सेन्सेक्सने 180 अंकांची उसळी घेतली.

टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, स्टेट बँक, एल अ‍ॅँड टी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांना आलेल्या मागणीमुळे दिवसभरात सेन्सेक्सने 200 अंकांची झेप घेतली होती, परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 179.75 अंकांनी वाढून 20,103.53 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 55.30 अंकांनी वाढून 6074.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 29 जानेवारी रोजी जाहीर होणा-या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅँक व्याजदरात किमान पाव टक्क्याने कपात करण्याच्या बाजाराच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पतधोरण आढाव्याच्या अगोदरच स्थावर मालमत्ता, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली
वस्तू आणि बँक समभागांची जोरदार खरेदी केली. अगोदरच्या सत्रात सेन्सेक्स 103 अंकांनी घसरला होता. त्यामुळे तो फायदा घेऊन गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीचा पर्याय स्वीकारला.