आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांच्या मागणीत होणार वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - तब्बल नऊ महिन्यांनंतर झालेल्या व्याजदर कपातीचे रिअल इस्टेट क्षेत्राने मनापासून स्वागत केले आहे. रिझर्व्ह बँकेने अतिशय सकारात्मक पाऊल उचलले असून स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विदेशी थेट गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळण्याबरोबरच घरांची मागणीदेखील यामुळे वाढणार असल्याचा आशावाद स्थावर मालमत्ता विकासक आणि सल्लागारांनी व्यक्त केला आहे. गृह खरेदीदार आणि बांधकाम विकासक या दोघांसाठी व्याजदर कपात फलदायी ठरणार आहे.

जॉन्स लँग लासेलचे एमडी (भांडवल बाजारपेठ) शोबीत अगरवाल म्हणाले, व्याजदर कमी करून अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभतेची स्थिती सुधारण्याचे वचन आरबीआयने पाळले आहे. सहामाही पतधोरणातील उपाययोजना जाहीर करून आरबीआयने सकारात्मक पाऊल टाकले असून त्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मागणी तसेच गुंतवणूक या दोन्हींना चालना मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांनादेखील यातून सकारात्मक संदेश मिळाला आहे. तर व्याजदरात झालेली पाव टक्का कपात स्वागतार्ह असली तरी केवळ पाव टक्का कपात पुरेशी नाही. नसल्याचे मत क्रेडाईचे राष्‍ट्री य अध्यक्ष ललित कुमार जैन यांनी व्यक्त केले.
घरांच्या किमती आवाक्यात येणे गरजेचे असून त्यासाठी चढे दरकमी करण्याची गरज असल्याचे मत नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलचे महासंचालक, आर. आर. सिंग यांनी व्यक्त केले आहे.

गुंतवणुकीला चालना मिळणार
व्याजदर कपात अल्प असली तरी स्थावर मालमत्ता क्षेत्रातील मागणी आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या दृष्टीने निश्चितच सकारात्मक आहे. पतधोरणातील वृद्धीधिष्ठित उपाययोजना आणि त्या जोडीला सरकारच्या वित्तीय उपाययोजना या वर्षात उद्योग क्षेत्रासाठी नक्कीच चांगल्या ठरतील.
संजय चंद्रा, व्यवस्थापकीय संचालक, युनिटेक