आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACEBOOK पुढे ORKUT ठरले FAIL; वाचा, GOOGLEच्या अन्य नेटवर्किंग साइट्सबाबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
GOOGLE ने आपले स्वत:चे पहिले सोशल नेटवर्क 'ORKUT' बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक दशकापूर्वी सुरू झालेल्या ORKUT सुरुवातीच्या काळात तरुणाईने तुफान प्रतिसाद दिला होता. मात्र, 'फेसबुक'च्या आगमनामुळे ORKUT ची लोकप्रियता कमी झाली. विशेष म्हणजे फेसबुकशी स्पर्धा करताना ORKUT सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे GOOGLE ने आपली ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 30 सप्टेंबरपासून ORKUT बंद होणार आहे.
'फेसबुक'ने तरुणाईच्या मना एक खास स्थान निर्माण केले आहे. ORKUT मात्र, अपयश आले. हळू हळू ते लोकांपासून दूर झाले. नेटिजन्समध्ये ORKUT बाबत उत्साह न दिसून आल्यामुळे GOOGLE ने ORKUT बंद करण्याचा ‍िनर्णय घेतला आहे.
ORKUT ही नेटवर्किंग साइट जवळपास 10 वर्षांपूर्वी सुरु झाले होते. मात्र, या गुगल ब्रान्डची यशाचे उंच शिखर चढतानाच वाटेत दमछाक झाली.

GOOGLEद्वारा लॉन्च करण्‍यात आलेले हे सोशल नेटवर्क भारत आणि ब्राझ‍िलमध्ये सर्वाधिक वापरले जाते. परंतु आता आपल्या अन्य नेटवर्किंग सर्व्हिसेस विकसित कण्यासाठी GOOGLE ने ORKUT बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंटरनेटच्या मायाजालात अग्रेसर असलेल्या GOOGLE ने अन्य क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला असेल, परंतु सोशल नेटवर्किंगबाबत GOOGLE चे सगळे दावे FAIL ठरले आहेत. आपला नफा वाढवण्याच्या उद्देशाने GOOGLE ज्या पद्धतीने नेटवर्किंग साइटमध्ये गुंतवणूक केली, परंतु नफा तर सोडाच तेथे नुकसानच जास्त झाल्याचे दिसून आले.
(फाइल फोटो)
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, गुगलच्या काही नेटवर्किंग साइट्सबाबत...