आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅपिटल प्रोटेक्शन फंडात गुंतवणूक करावी का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या बाजारात कॅपिटल प्रोटेक्शन योजना मोठ्या प्रमाणात येत आहेत. प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी अशा स्वरूपाची योजना सादर करत आहे. कॅपिटल प्रोटेक्शन अर्थात भांडवलाचे संरक्षण अशा आकर्षक शब्दांमुळे गुंतवणूकदारांचे या योजनांकडे चटकन लक्ष जाते. मात्र, या योजना खरोखरच फायदेशीर आहेत का? अशा आकर्षक योजनांमुळे गुंतवणूकदार अडकत आहेत का? हे जाणून घेण्यासाठी या योजनांची सविस्तर माहिती घेऊया...
०कॅपिटल प्रोटेक्शन फंड आहे तरी काय? तसे पाहिले तर या योजना रोखे आधारित हायब्रीड क्लोज एंडेड फंड आहेत. यात डेट आणि इक्विटी यांचे सुयोग्य मिश्रण असते. गुंतवणुकीचा एक हिस्सा डेटमध्ये अशा पद्धतीने गुंतवला जातो, जो परतावा म्हणून कामी यावा आणि एक हिस्सा इक्विटीमध्ये अशा रीतीने गुंतवतात, ज्यामुळे गुंतवणूकवाढीला चाल मिळते. डेटमधील गुंतवणूक स्थिर म्यॅच्युरिटी योजना (एफएमपी) प्रमाणे एक्रुअल आधारावर ठेवली जाते आणि इक्विटीचा हिस्सा विविध प्रकारात गुंतवतात. या योजना क्लोज एंडेड असतात आणि तीन ते पाच वर्षांच्या असतात.
० फंडाची कार्यपद्धती : सर्वप्रथम गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यावे की, अशा प्रकारच्या योजनांचा पोर्टफोलिओ भांडवलाचे संरक्षण करण्यावर भर देणारा असतो, मात्र त्याची खात्री नसते. त्यामुळे अशा योजनांत भांडवलाच्या सुरक्षिततेची हमी नसते. यातील गुंतवणूक बहुतांश डेटमध्ये असली तरी त्यातही जोखीम असतेच.
या योजना कसे काम करतात हे एक उदाहरण घेऊन समजून घेऊयात : फंड अ हा कॅपिटल प्रोटेक्शन फंड, पाच वर्षांचा क्लोज एंडेड प्रकारचा आहे. बाजारात उपलब्ध समान कालावधीच्या एएए दर्जाच्या डेट सेक्युरिटीज 9 टक्के वार्षिक परतावा देत आहेत. आता अ फंडाची रचना पुढीलप्रमाणे राहील : आपण गुंतवलेल्या 100 रुपयांपैकी 65 रुपये 9 टक्के परतावा देणा-या डेट सेक्युरिटीजमध्ये गुंतवले जातील. उरलेले 35 रुपये भांडवल वृद्धीसाठी इक्विटीमध्ये तसेच ट्रेडिंगसाठी वापरात येतील. समजा इक्विटीने वार्षिक 10 टक्के परतावा दिला, तर आपल्या गुंतवणुकीचे मॅच्युरिटी मूल्य 156.37 रुपये होईल. याचाच अर्थ कॅपिटल प्रोटेक्शनसह 9.37 टक्के करपूर्व परतावा मिळाला. इक्विटी ज्याप्रमाणात चांगली कामगिरी करेल त्या प्रमाणात कॅपिटल ओरिएंटेट फंड चांगला परतावा देईल. मात्र, इक्विटीची कामगिरी सुमार झाल्यास फंडातून मिळणारा परतावा तसाच राहील.
० परताव्यावर लागतो कर : अशा फंडातून मिळणारा परताव्यावर कर द्यावा लागतो. अशा योजना डेट श्रेणीच्या कर कक्षेत येतात. मात्र, आपण स्वत:चा कॅपिटल प्रोटेक्शन फंड बनवून कर वाचवू शकतो. यासाठी चांगला परतावा देणा-या एफएमपी आणि डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडांचा पोर्टफोलिओ बनवावा लागतो. गरज भासल्यास यासाठी वित्तीय सल्लागाराची मदत घ्यावी. अशा प्रकारचा पोर्टफोलिओ कर वाचवण्यासाठी जास्त किफायतशीर आणि लवचिक असतो.
० अशा फंडात गुंतवणूक करावी का : आपल्या लक्ष्य आणि उद्दिष्टानुसार कोणतीही गुंतवणूक करावी. म्युच्युअल फंडाच्या अनेक अशा योजना आहेत ज्या कॅपिटल प्रोटेक्शन फंडापेक्षा चांगला परतावा देऊ शकतात. तसेच या फंडाची करसंबंधी रचना फारशी
आकर्षक नाही. शिवाय योग्य पोर्टफोलिओ बनवून कर वाचवता येतो. तसेच जे कमी कराच्या कक्षेत येतात त्यांच्यासाठी बँकांतील मुदत ठेवींचा पर्याय यापेक्षा चांगला आहे. त्यामुळे तत्काळ रोख रकमेची गरज भासल्यास अडचण येत नाही.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.