आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक नियोजनाची गाडी रुळावर कशी आणाल?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या गुंतवणुकीची सुरक्षितता हीच आपल्याला त्याच्या संभाव्य परताव्यापासून वंचित करत असते हे पुढील उदाहरणावरून दिसून येते. दिलीप पांडे (46), एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहेत. ते त्यांच्या 45 वर्षीय पत्नी-दीप्ती (जी फार्मा कंपनीत कामाला आहे,) व दोन मुलांसह - गौतमी 19 वर्षे आणि गौरव 13 यांच्यासोबत मुंबई येथे राहतात. खाली दिलेल्या तक्त्याकडे बघितल्यावर असे लक्षात येत की, उत्पन्नातून खर्च वगळता त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात बचत उपलब्ध राहते, पण प्रश्न असा पडतो की, त्यांनी आपले उद्देश, ध्येय जसे की मुलांचे शिक्षण, लग्न व सेवानिवृत्ती साठी बचत करणे का चालू केले नाही ? दिलीप पांडे ह्या प्रश्नाला साजेसे उत्तर देऊ शकत नाही. पण नक्कीच त्यांच्याकडे सेवानिवृत्ती घेण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी आहे, ज्यात ते योग्य ते आर्थिक नियोजन करून प्रत्येक गुंतवणूक केलेल्या रुपयावर उत्तम परतावा मिळवू शकतात.


पांडेकडे दोन मालमत्ता असून त्यातील ज्यात ते राहतात ते घर ( स्थावर मालमत्ता पूर्ण संपत्तीमध्ये ग्राह्य धरले जात नाही) आणि दुसरे घर जे त्यांनी 2005 मध्ये 15 लाखांना विरार येथे घेतले आहे ज्याची आजची किंमत 45 लाख आहे. या दुस-या घरावर 7.5 लाखांचे गृहकर्ज आहे, ज्यातून त्यांना मासिक 12750 रु. भाडे मिळते. वरील दर्शविलेल्या मालमत्तेव्यतिरिक्त वडिलोपार्जित दोन मालमत्ता आहेत ज्यातून त्यांना अनुक्रमे 8250 रु., 4500 रु. मासिक भाडे येते. पांडे परिवाराचे पूर्ण संपत्तीचे विवरण आणि त्यांचे उद्देश / ध्येय यांना लागणा-या निधीची माहिती दिलेली आहे. वरील देलेल्या माहितीच्या आधारे, एक आर्थिक नियोजनकर म्हणून आम्ही पुढील बाबी पांडे यांना सुचवू. 1. पांडेनी आपले दुसरे घर 45 लाखांना विकून टाकावे. कारण त्यातून फक्त वार्षिक 3.4 % परतावा मिळत आहे. तसे बघितले तर त्यातून मिळणारे उत्पन्न हे गृहकर्जावर जाणा-या मासिक हप्त्यासोबत ऑफसेट होईल व टोटल उत्पन्नातून फक्त दरमहा 1500 रु. कमी होतील (12750 - 11250= 1500 रु). विकलेल्या घराचे सगळे टॅक्स व गृहकर्जाची परतफेड होऊन 33 लाख रुपये शिल्लक राहतात. जे ते आपली उद्दिष्टे, जसे की सेवानिवृत्ती, मुलांची शिक्षणे व लग्न सध्या करू शकतात. 2. घर विकलेल्या रकमेतून दर महिन्याला 1 लाख असे 33 महिने बॅलेंस्ड म्युच्युअल फंड स्कीममध्ये सिपमार्फत गुंतवावे, जेणेकरून सेवानिवृत्तीसाठी लागणा-या राशीत जवळपास 1.854 करोड रुपये जमा होतील, उर्वरित रक्कम ही पीपीएफ (दरमहा 5751 रु. अधिक भरणे म्हणजे 5751+3000 = 8751 रु. पीपीएफमध्ये गुंतवणे) व ईपीएफ यांच्यामार्फत 12 वर्षांत सेवानिवृत्तीसाठी लागणारे 2.5 करोड रुपये जमा होतील. 3. गौतमीच्या शिक्षणासाठी 8.16 लाख रुपये 4 वर्षांनी लागणार आहे, 4 वर्षे हा कालावधी फार अल्प असल्यामुळे बँक ठेवी मोडून पूर्ण करावा, परंतु येथे पांडेकडे खर्च जाऊन बचत ही उत्तम परिस्थितीत असल्या कारणाने त्यांनी जोखीम घेऊन म्युच्युअल फंडमध्ये 12500 रु. ची सिप चालू करावी. 4. गौरवच्या शिक्षणासाठी 45 लाख रुपये 8 वर्षांनी लागणार आहेत, 8 वर्षे हा कालावधी पुरेसा असल्या कारणामुळे व म्युच्युअल फंड 8 वर्षांत उत्तम परतावा देण्याची कुवत ठेवतो. त्यामुळे मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठी म्हणून पांडे बॅलेंस्ड म्युच्युअल फंड स्कीम जसे की ऌऊऋउ. एखाद्या इंडेक्स फंडमध्ये अनुक्रमे 8000, 8000 व 4000 असे 20000 रुपयांची सिप चालू करावी, ज्यातून 8 वर्षांनी जवळपास 35 लाख रु. जमा होतील. उरलेली रक्कम पांडेकडे असलेले शेअर्स विकून हे ध्येय गाठू शकतात. 5. मुलींच्या लग्नासाठी 6 वर्षांनी लागणारे 21 लाख रुपये जमा करण्यासाठी पांडेनी गोल्ड ईटीएफमध्ये सिप जेणेकरून लग्नाच्या वेळेस सोने घेण्यास गोल्ड ईटीएफमध्ये जमा झालेली रक्कम मदत करेल, तसेच थोडी रक्कम परत बॅलेंस्ड फंडमध्ये गुंतवावी. ६. मुलाच्या लग्नासाठी 13 वर्षांनी लागणारे 30 लाख रुपये, डायव्हर्सिफाइड तसेच मिड कॅप फंड जसे की Sundaram select Mid Cap, Reliance Top 200 ह्यामध्ये 3000 व 3500 रुपयांची सिप चालू करावी. ७. पांडेनी जी गोष्ट सर्वोकृष्ट केली आहे ती म्हणजे त्यांनी 7500000 लाखांचा टर्म इन्शुरन्स काढलेला आहे, परंतु त्याचा कालावधी 10 वर्षेच घेतला आहे जो की त्यांनी कमीत कमी 15 वर्षे करून घेतला पाहिजे. तसेच जरी त्यांना त्यांच्या कंपनीतून 60000 रु. मेडिकल बिल देत असली तरी ती रक्कम फार कमी आहे त्यामुळे त्यांनी अ‍ॅडिशनल हेल्थ इन्शुरन्स विकत घेतला पाहिजे. ज्यात फॅमिली फ्लोटर प्लॅन 5 लाखांवर असलेला 10 लाखांचा टॉप-अप कव्हर घेतला पाहिजे. ८. आपत्कालीन निधी म्हणून पांडेनी 6 महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम बाजूला ठेवावी.

उद्देश साध्य करण्यासाठी लागणारा निधी
उद्देश उर्वरित भविष्यातील वापरावयाचे पर्याय जास्तीची गुंतवणूक
कालावधी खर्च प्रतिमहिना रु.
गौतमी शिक्षण 4 8.16 - 12500
गौरव शिक्षण 8 30 - 16000
गौतमी विवाह 6 21 - 18000
गौरव विवाह 13 30 6500
सेवानिवृत्ती 12 2.5 ईपीएफ +पीपीएफ 5751*
+दुसरे घर विकून
येणारी किंमत
गुंतवणुकीसाठी 53000
लागणारी बचत
एक्स्ट्रा इन्शुरन्स 1800
टोटल 54800