गॅजेट डेस्कः फोटोग्राफीचे क्रेझ अनेकांना असते. बरेच जण
फेसबुक प्रोफाईलसाठी तसेच इतर सोशल नेटवर्कींगसोबतच पर्सनल अल्बमसाठी अनेक फोटो काढतात, आणि त्याला मनमर्जीप्रमाणे सजवतातही. सध्या मोबाईलमुळे फोटोग्राफीचे क्रेझ तर फारच वाढले आहे. मात्र पासपोर्ट फोटोचा विषय निघताच अनेकांना घाम फुटतो. कारण हे फोटो, ओळखपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट, पॅनकार्ड अशा ऑफिशीअल जागी वापरायचा असतो. त्यामुळे हा फोटो चांगला यावा यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. अशा कामासाठी बरेचजण फोटोग्राफरकडेच जाणे पसंद करतात.
मात्र आम्ही तुम्हाला हा पासपोर्टफोटो घरीच बनवायला शिकवले तर...
आश्चर्य वाटले ना... पण हे शक्य आहे
अनेकवेळा तुम्हाला पासपोर्ट फोटोची अत्यंत गरज असते. पण तेव्हा तुमच्याकडे पासपोर्ट फोटो नसेल तर धांदल उडते. अशा वेळी फोटोग्राफरही अर्जंट फोटोसाठी वाट्टेल तेवढे पैसे मागतात. आणि नाईलाजाने तुम्ही ते देताही. मात्र या पुढे असे होणार नाही. कारण आम्ही सांगतोय अशी आयडिया की, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या साह्याने पासपोर्ट फोटो तुम्हाला हवा तसा बनवू शकाल. यासाठी तुम्हाला फोटोशॉपची गरज भासते. मात्र जर तुम्हाला फोटोशॉप येत नसेल, तर अशा लोकांसाठी एक खास अॅपही आहे. जर हा फोटो तुम्हाला प्रिंट काढून हवा असेल तर तुम्ही पॉकेट फोटो प्रिंटरच्या साह्यानेही काढू शकता.
divyamarathi.com तुम्हाला आज सांगणार आहे काही विशेष टीप्स... ज्याच्या साह्याने तुम्ही बनवू शकाल तुमचा स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो...
पुढील स्लाईडवर पहा... पासपोर्ट साईज फोटो अॅपच्या साह्याने कसा बनवायचा...
(वरील छायाचित्रे केवळ प्रस्तुतीसाठी वापरण्यात आली आहेत.)